गोव्यात अनेक ठिकाणी वाहतूक नियम फलक नाहीत

गोव्यात सुधारित मोटार वाहन कायद्याची 1 एप्रिलपासून कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे.
Sign Borads
Sign BoradsDainik Gomantak

पणजी: गोव्यात सुधारित मोटार वाहन कायद्याची 1 एप्रिलपासून कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत तब्बल 27 वर्षांनी वाढ झाल्याची माहिती गोव्याचे वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी दिली आहे. राजन सातार्डेकर यांनी गुरुवारी मान्य केले की गोव्यात अनेक ठिकाणी वाहतूक नियम फलक नाहीत आणि पीडब्ल्यूडीने आता त्यावर काम करण्यास सुरू केले आहे. (Many places in Goa do not have traffic sign boards)

Sign Borads
गोव्यात प्रतिलिटर दुधामागे दोन रुपयांची वाढ

राज्यात वाहतूक नियम फलक उभारले जात आहेत. PWD (रस्ते विभाग) ने यावर काम सुरू केले आहे आणि लवकरच त्याचे टेंडर काढले जाईल, असे सातार्डेकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, "सुधारित मोटार वाहन कायद्यातील 37 तरतुदींपैकी कोणतीही तरतूद रद्द करण्यात येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) समिती प्रत्येक राज्यात सुधारित मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवत आहे." सातार्डेकर यांनी लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Sign Borads
राहुल म्हांबरेंचा ‘आप’ला राजीनामा

नेहमीच्या दंडापेक्षा दहापट दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. विनाहेल्मेट गाडी चालवल्यास तसंच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्यास 1000 रुपयांचा दंड आणि परवाना रद्द करण्यात येणार आहे. गोवा सरकारकडून (Goa Government) या संबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. केंद्राकडून राज्य सरकारला हा कायदा अमलात आणण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली होती. त्यानुसार हा कायदा लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com