Many shops in Alwadi market were flooded
Many shops in Alwadi market were flooded

आळवाडी बाजारपेठेतील अनेक दुकानात पुराचे पाणी शिरले

सावंतवाडी -  रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पेडणे तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावासह सिंधुदुर्गातील (Sindhudurg) बांदा भागालाही पूर्णतः प्रभावित केले आहे. महाराष्ट्र सीमेवरील (Maharashtra border) तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पहाटे 4  वाजण्याच्या सुमारास बांदा शहरातील आळवाडी - मच्छी मार्केट बाजारपेठेत पाणी घुसले. परंतु आज थोडे पाणी ओसरले आहे.  (Many shops in Alwadi market were flooded)

शहरातील आळवाडी - निमजगा रस्ता पाण्याखाली गेला होता. येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान पहाटे अंधारातच सुरक्षित स्थळी हलविले होते. पेडणे तालुक्यातील पत्रादेवीला लागून असलेल्या बांदा शहर व परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदी दुथडी 
भरून वाहत आहे.

आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी मच्छी मार्केट परिसरात भरण्यास सुरुवात झाल्याने व्यापारी व स्थानिकांची एकच तारांबळ उडाली होती.  आळवाडी येथील अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पाण्याची पातळी वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सकाळी तलाठी वर्षा नाडकर्णी, सरपंच अक्रम खान यांनी या ठिकाणी पाहणी करत स्थानिकांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच नुकसानग्रस्त व्यापारी व नागरिक यांची भेट घेत विचारपूस केली आहे. 

आळवाडी येथील मच्छी मार्केट इमारतीत पुराचे पाणी घुसले होते. येथील आळवे यांच्या हॉटेल पर्यंत पुराचे पाणी होते. मात्र आळवाडी-निमजगा रस्ता पहाटेच पाण्याखाली गेला
होता. येथील छोटे विक्रेते, स्टॉल, चिकन सेंटर मध्ये अचानक पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा देखील सखल भागात पाणी आल्याने
अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर दिवसभर कायम असल्याने पूर प्रवण क्षेत्रातील नागरिक चिंतेत आहेत. निमजगा येथील भंगार वस्तीत आजही गटार
तुंबून पावसाचे पाणी घरात घुसले.

एनडीआरएफचे पथक फिरकलेच नाही

जिल्हा प्रशासनाने बांदा शहर हे पूर प्रवण असल्याने सावंतवाडी तालुक्यासाठी जोखमीच्या वेळी एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. या पथकाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शहरातील तेरेखोल नदी व पूर प्रवण क्षेत्राची पाहणी केली होती. आज पहाटेच पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. दुपारपर्यंत याठिकाणी पूरस्थिती होती, मात्र प्रशासनाचे एनडीआरएफचे पथक याठिकाणी फिरकलेच नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com