Goa News : म्हापसा येथील 21 वर्षीय युवकाचा आसगावात तळीत बुडून मृत्यू

घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्‍याच्‍या सुमारास घडली
Boy drowned At Assagao
Boy drowned At Assagao Dainik Gomantak

21 Year Boy drowned At Assagao : गिरी म्हापसा येथील 21 वर्षीय युवकाचा आपल्या मित्रांसह मंदिराच्या तलावात आंघोळ करत असताना बुडून मृत झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Boy drowned At Assagao
Goa Monsoon Update 2023: पावसाचा जोर कायम; लाखाे रुपयांच्या हानीसह जनजीवन विस्कळीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरी व इतर परिसरातील 15 ते 22 वर्षे वयोगटातील आठ मुलांचा एक गट आसगाव येथील बाळा साखळेश्वर देवस्थान परिसरातील तळीत आंघोळ करण्यासाठी आला होता. यावेळी काही युवक व अँथनी फर्नांडिस (21, रा. गिरी) आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते.

मात्र, आंघोळ करत असताना अँथनी या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिकांनी दाखल होत युवकाला बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

युवकाला तत्काळ म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हणजूण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविला. याबाबत पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com