Goa Crime: जमिनीवरुन मोठा वाद; प्राणघातक हल्ला प्रकरणी संशयिताला 3 महिन्‍यांनंतर अटक

कामरखाजन-म्हापसा येथील जमिनीत मातीचा भराव टाकण्याच्या वादातून मार्बल ग्रेनाईटस्‌ व्यावसायिकावर दगडाने प्राणघातक हल्ला झाला.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

Goa Crime: कामरखाजन-म्हापसा येथील जमिनीत मातीचा भराव टाकण्याच्या वादातून मार्बल ग्रेनाईटस्‌ व्यावसायिकावर दगडाने प्राणघातक हल्लाप्रकरणातील फरार संशयित दत्तराज तुयेकर (कामरखाजन) यास पोलिसांनी आज शनिवारी अटक केली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, हा प्रकार गेल्या 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला होता. घटनेनंतर मागील तीन महिने संशयित फरार होता. त्‍याच्‍याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

संशयित आपल्या कामरखाजन येथे घरी आला असल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज दुपारी त्‍यांनी संशयिताच्या घरावर छापा टाकून त्यास पकडले. यापूर्वी संशयिताचे वडील रावजी तुयेकर यांच्‍यासमवेत चौघांना अटक करण्‍यात आली होती.

जखमी फिर्यादी आनंद व्यास यांचे कनक ग्रेनाईटस्‌ हे मार्बल ग्रेनाईट्‌सचे आस्थापन आहे. या आस्थापनाच्या शेजारीच संशयित रावजी तुयेकर यांची शेतजमीन आहे.

Goa Crime
Coal Transportation: 'कोळसा हाताळणी कायमस्वरुपी बंद करा'

सदर जमिनीसह फिर्यादीच्या मालमत्तेत संशयितांनी मातीचा भराव टाकून ती बुजविण्याचा प्रयत्न केला होता. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

फिर्यादी आपल्या पत्नीसह आस्थापनात होते. त्यावेळी संशयित रावजीतुयेकर, त्यांचा मुलगा दत्तराज तुयेकर, पत्नी रेश्मा तुयेकर, तसेच रोशन मांद्रेकर, मोहम्मद हलगेरी, अरमान मलीक व डेल्टन यांनी व्यास यांच्या मालमत्तेत घुसखोरी करून त्यांच्यावर दगड-धोड्यांनी हल्ला चढविला. तसेच कारचे अंदाजे 1 लाखांचे नुकसान केले होते.

Goa Crime
Goa News: ‘ती’ गहाळ फाईल शोधण्याची जबाबदारी आता पोलिसांवर

संशयितांनी पोलिसांनाही केली होती शिवीगाळ

संशयितांनी पोलिसांनाही शिवीगाळ करत त्यांनाही गंभीर परिणामांची धमकी दिली होती. पोलिसांच्या धरपकडीत संशयित रावजी तुयेकर व मोहम्मद हलगेरी (काणका-बांध) हे दोघे सापडले, तर इतरांनी पळ काढला होता.

त्यातील अरमान शेख (राजवाडा-म्हापसा) व मलीक (वेर्ला) या दोघांना पोलिसांनी नंतर अटक केली होती. दरम्‍यान, संशयितांविरोधात म्हापसा पोलिसांनी भादंसंच्या 143, 147, 148, 447, 341, 504, 427, 307, 506 (2), 353 व 149 कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आशिष परब करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com