Illegal Construction in Mapusa: म्हापसा शहरातील अतिक्रमणे हटविली

पालिकेच्या निर्णयाचे कौतुक : दिवसभर पार्क केलेल्या दुचाकींवर कारवाईची मागणी
Illegal Construction in Mapusa
Illegal Construction in MapusaGomantak Digital Team

Illegal Construction in Mapusa: येथील नगरपालिकेने मागील पाच दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली असून या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.

मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर व पालिका मंडळाने हा पुढाकार घेतला आहे. आता बाजारपेठ किंवा इतरत्र दिवसभर पार्किंग करून ठेवण्यात येणाऱ्या दुचाकींवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

म्हापसा पालिकेने अतिक्रमण गेल्या बुधवारपासून (ता.१०) मोहीम राबविण्यास सुरवात केली असून जवळपास 11 ते 1ट्रक साहित्य जमा केले. यामध्ये इलेक्ट्रिक साहित्य, हार्डवेअर, सूचना फलकांचा समावेश आहे.

अनेकांनी पदपथ तसेच रस्त्याच्या रूंदीकरणावर अतिक्रमण केले होते. त्यांचा माल जप्त करण्यात आला. बेशिस्त व्यावसायिकांमध्ये शिस्त यावी, यासाठी हे प्रयत्न आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यापुढे चालूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिली.

Illegal Construction in Mapusa
Flight To Goa: येत्या 23 मे पासून 'या' शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होतेय, जाणून घ्या सविस्तर

म्हापसा पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याने शहराने आता मोकळा श्वास घेतला आहे. मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांसह स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.

आधीच अरूंद असलेल्या रस्त्यावर अनेक विक्रेते फळे तसेच इतर साहित्यांची विक्री करायचे. रस्त्यावरील या अनधिकृत विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडायची, तसेच मार्केटमधील दुकानदारांवर याचा आर्थिक परिणाम व्हायचा.

Illegal Construction in Mapusa
Home Decoration Ideas: उन्हाळ्यात घर सजवण्यासाठी 'या' सिंपल टिप्स करा फॉलो

म्हापसा पालिकेने रात्रीच्या वेळी फास्ट फूडवाले जे सार्वजनिक रस्ता अडवून टेबल व मेज टाकून व्यवसाय करायचे, त्यांच्यावर देखील ही कारवाई केली. त्यामुळे प्रसिद्ध सिने अलंकार किंवा टॅक्सी स्टॅण्ड तसेच इतर रस्त्यांवरील ऑम्लेट गाडेधारकांना बाजूला करण्यात आले आहे.

पालिकेने बेकायदा गोष्टींवर केलेली ही कारवाई स्वागतार्ह आहे. कारण, अनधिकृत व अतिक्रमणामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. आता या कारवाईमुळे शहरात शिस्त आली आहे.

पालिकेने ही कारवाई यापुढे अशीच चालू ठेवावी. कारण, पालिकेने मोकळीक दिल्यास पुन्हा अतिक्रमण येण्यास वेळ लागणार नाही, असे मत म्हापसेकरांनी व्यक्त केले आहे.

Illegal Construction in Mapusa
Vasco News : मासळी विक्रेत्या महिलांचा आक्रमक पवित्रा

दंड आकारणीतून २५ हजारांचे शुल्क जमा

म्हापसा पालिकेने मागील चार दिवसांत जवळपास १५ ट्रक अतिक्रमणाचा माल जप्त केला. यात इलेक्ट्रिक साहित्य, हार्डवेअर, स्टिलचे स्टॅण्ड तसेच जवळपास १०० हून अधिक अनधिकृत सूचना फलकांचा समावेश आहे.

यातील काही साहित्य पालिकेने संबंधितांना दंड भरल्यानंतर परत केले. यातून पालिकेने आतापर्यंत २५ हजार शुल्क जमा केले. तर अजूनही बरेच सामान संबंधित दुकानदारांकडून सोडवून नेणे बाकी आहे.

Illegal Construction in Mapusa
New Policy For OTT Content: OTT कंटेट वर झाली संसदेत चर्चा... आता होणार हे नवे बदल

काही दुकानदारांना पालिका ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावणार आहे. कारण, अनेकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व बेशिस्तपणा केलेला होता. तर काही घाऊक दारू विक्रेते हे किरकोळ विक्री करायचे. आणि हा खाली दारुच्या बाटल्यांचा खच म्हापसा बसस्थानक आवारात टाकायचे.

Illegal Construction in Mapusa
Illegal Tax Collection : ‘त्या’ व्हिडिओनंतर मनपाने खरेदी केली पावती मशीन

हप्त्यासाठी ही कारवाई नव्हे !..

बुधवारपासून म्हापसा पालिकेने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. उपसभापती जोशुआ डिसोझा यांनीही पालिकेच्या या कारवाईचे कौतुक केले आहेते म्हणाले, अतिक्रमण हटावची शहराला आवश्यकता होती. कारण, अनेकांनी पदपथावर वाटेल तशी जागा अडवून साहित्य मांडून ठेवले होते. त्यामुळे चालण्यासाठी वाट उरली नव्हती. मुळात ही कारवाई हप्ता गोळा करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी नाही, असा दावा त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com