Sonali Phogat Case : एडविन नुनिस यास सशर्त जामीन

संशयितला कर्लीस रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, ही महत्त्वाची अट घातली आहे. त्याशिवाय परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाता येणार नाही व तपास कामात हस्तक्षेप करता येणार नाही या अटींचा समावेश आहे.
Sonali Phogat Murder Case
Sonali Phogat Murder CaseDainik Gomantak

योगेश मिराशी

Sonali Phogat Case : सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाशी संलग्न असलेल्या कर्लीस रेस्टॉरंटचा चालक एडविन नुनिस यास म्हापसा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयितला कर्लीस रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, ही महत्त्वाची अट घातली आहे. त्याशिवाय परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाता येणार नाही व तपास कामात हस्तक्षेप करता येणार नाही या अटींचा समावेश आहे.

तसेच दत्तप्रसाद गावकर, रामदास माद्रेकार व एडविन नुनिस यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, हा हणजूण पोलिसांनी केलेल्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

‘कर्लिस’चा मालक एडवीन नुनीस याच्या जामीनअर्जावर मंगळवारी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला होता. एडवीन नुनीस यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना अ‍ॅड. सुरेंद्र देसाई यांनी न्यायालयाला सांगितले होते की, आपल्या अशिलास या प्रकरणात गोवण्याचा हणजूण पोलिसांनी प्रयत्न केला आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूशी तसेच ड्रग्स तस्करीशी नुनीस यांचा कुठलाच संबंध नाही. मुळात मयत सोनाली या इतर संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांच्यासोबत हणजूणमधील ‘ग्रँड लिओनी’ रिसॉर्टमध्ये उतरल्या होत्या. तिथेच सोनाली यांनी ड्रग्सचे सेवन केले व तेथून त्या दोघा सहकाऱ्यांसोबत ‘कर्लिस’ रेस्टॉरंटमध्ये आल्या होत्‍या.

Sonali Phogat Murder Case
Sonali Phogat Case : ‘ग्रँड लिओनी’वर हेतुपुरस्सर कारवाई टाळली!

अ‍ॅड. सुरेंद्र देसाई म्हणाले की, मुळात हणजूण पोलिसांनी ‘ग्रँड लिओनी’ या रिसॉर्टची चौकशी करण्याची गरज होती. कारण प्रमुख घटना याच रिसॉर्टमध्ये घडल्या होत्‍या. तेथूनच फोगट व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या बाटलीतून ड्रग्स ‘कर्लिस’ रेस्टॉरंटमध्ये आणले होते. ‘ग्रँड लिओनी’ हे रिसॉर्ट हे एका स्थानिक राजकारण्याच्या मित्राचे असल्याने पोलिसांनी त्‍याकडे दुर्लक्ष करीत हेतुपुरस्सर कारवाई टाळली, असेही ते आपल्‍या युक्तिवादात म्‍हणाले.

या पाण्याच्या बाटलीचा उल्लेख पोलिसांच्या पंचनाम्यात आहे. शिवाय कर्लिस रेस्टॉरंट हे मागील 40 वर्षांपासून कार्यरत आहे. रेस्टॉरंटच्या चारही बाजूने खुली जागा असून, रेस्टॉरंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मागील 40 वर्षाच्या कालवधीत कर्लिस हे थेट ड्रग्स तस्करीमध्ये गुंतल्याचे पोलिस रेकॉर्ड नाही, असा दावा नुनीस यांच्या वकिलाने न्यायालयासमोर केला.

दरम्‍यान, सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, एका निर्दोष महिलेचा कर्लिसच्या आवारात मृत्यू झाला. यास एडवीन नुनिस हेच जबाबदार आहेत. याच युक्तिवादाच्या आधारे कोर्टाने नुनीस याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com