Sunburn Festival 2022 : ‘सनबर्न ईडीएमला अखेरच्या क्षणी दिली परवानगी’

म्हापसा उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली माहिती
Sunburn Festival Goa
Sunburn Festival GoaDainik Gomantak

Sunburn Festival 2022: हणजूण येथे झालेला सनबर्न ईडीएम महोत्सव आयोजित करण्यासाठी 28 डिसेंबर रोजी शेवटच्या क्षणी म्हापसा उपअधीक्षक व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातून परवाने दिल्याची माहिती म्हापसा उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली.

या महोत्सवावेळी आयोजकांनी नियमांचे उल्लंघन केल्याची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्‍यायालयाने जबाबदार व्यक्तींवर केलेल्या कारवाईचा अहवाल मुख्य सचिवांना सादर करण्यास सांगितले आहे.

Sunburn Festival Goa
Money Laundering: गोवा जमीन हडपप्रकरणात संशयितांचे पैशांचे व्यवहार थेट विदेशातून!

महोत्सवावेळी ध्वनिप्रदूषण होत असल्याची तक्रार देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पोलिसांकडून कारवाई झाली नसल्याने राजेश तिवारी यांनी जनहित याचिका सादर केली होती. ही याचिका महोत्सवाच्या आयोजनाच्या पहिल्या दिवसानंतर सादर केली होती.

मात्र, त्याच्यासोबत आयोजकांनी घेतलेल्या परवान्यांची माहिती त्यात नव्हती. हे परवाने ऐनवेळी आयोजकांना दिल्याने त्यासाठी ते मिळवणे शक्य झाले नव्हते, अशी बाजू याचिकादाराच्या वकिलांनी मांडली होती. यासंदर्भातील माहिती देण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com