Goa: म्हापसा येथील कदंब बस स्टँड बनलं अमली पदार्थ सेवनाचे केंद्र?

एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सिरिंज सापडल्याने परिसरात एकच खळबळ
kadamba public toilet  insulin syringes
kadamba public toilet insulin syringesDainik Gomantak

म्हापसा येथील नव्या कदंब बस स्टँडबाहेर मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सिरिंज सापडल्याची धक्कादाक बाब समोर आली आहे. तसेच बस स्टँडच्या शौचालयात ही इन्सुलिन सिरिंज आढळल्या आहेत. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्य़ा प्रमाणात इन्सुलिन सिरिंज सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(Mapusa kadamba bus stand became a hub for drug use )

kadamba public toilet  insulin syringes
सत्तरी तालुक्यात बारा पंचायतीसाठी 102 उमेदवारी अर्ज दाखल

सिरिंजची संख्या आणि स्थिती पाहिल्यानंतर याचा वापर अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी केला जात असल्याचा दाट संशय प्रत्यक्षदर्शींंनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हापसा बस स्टँड परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या असल्याने सिरिंजचा वापर अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी आणि टॉयलेटमध्ये फेकण्यासाठी केला जात असल्याचा संशय ही व्यक्त केला जात आहे.

kadamba public toilet  insulin syringes
चिखली दाबोळी सर्कल अतिक्रमणाविरोधात नौदलाची पंचायतीची तक्रार

कदंबा बस स्टँड परिसरातील हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीसांनी पुढील तपासाकरीता सकारात्मकता दाखवली आहे. मात्र याबाबत कदंब वाहतूकदाराकडून कोणीही तक्रार दाखल न केल्याने पुढील तपास करण्यात येणार नसल्याचे म्हापसा पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सिरिंजची संख्या पाहता संबधित परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन करण्यांची संख्या असू शकते असे ही बोलले जात आहे. त्याच प्रमाणे पडलेल्या सिरिंज पाहता हा प्रकार बरेच दिवसांपासून सुरु असावा असा हा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com