Goa Politics: म्हापसा नगराध्यक्षांचा राजीनामा अखेर मंजूर

वायंगणकरांनी दिलेला नगराध्यक्षपदाचा राजीनामा बुधवारी ग्राह्य झाल्याचे पालिका प्रशासन खात्याकडून सांगण्यात आले.
Mapusa Municipality|Goa Politics
Mapusa Municipality|Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: म्हापसा येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा शुभांगी वायंगणकरांनी दिलेल्या राजीनामा अखेर बुधवारी सकाळी ग्राह्य झाला. 11 जानेवारीला वायंगणकरांनी पणजीत पालिका प्रशासन संचालकांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.

सदर राजीनामा सादर केल्यानंतर सात दिवसांची मुदत असते. या काळात संबंधित व्यक्ती स्वतःचा राजीनामा मागे घेऊ शकतो. तो मागे न घेतल्यास राजीनामा आपोआप ग्राह्य धरला जातो. तशी कायद्यात तरतूद आहे.

वायंगणकरांनी दिलेला नगराध्यक्षपदाचा राजीनामा बुधवारी ग्राह्य झाल्याचे पालिका प्रशासन खात्याकडून सांगण्यात आले. राजिनाम्यांमुळे अखेर सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले.वायंगणकर यांनी जवळपास 19 महिने नगराध्यक्षपद भूषविले.

Mapusa Municipality|Goa Politics
Kalasa Project: कर्नाटकला वन परवानगी रोखण्यासाठी गोवा सरकारचे प्रयत्न

पुढील नगराध्यक्ष कोण?

पुढील नगराध्यक्ष कोण व्हावा, यासाठी अद्याप सत्ताधारी गटाची बैठक होणे बाकी आहे. यावेळी महिलांसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी सध्या नगरसेविका प्रिया मिशाळ व नगरसेविक डॉ. नूतन बिचोलकर यांची नावे चर्चेत असली तरी मिशाळ यांचे नाव आघाडीवर आहे.

सध्या म्हापसा पालिकेतील एकूण 20 नगरसेवकांपैकी सत्ताधारी पक्षाकडे 14 नगरसेवक आहेत.

पालिका कारभारावर प्रश्‍नचिन्ह!

  • मंगळवारी सायंकाळी नगराध्यक्षांनी शिगमोत्सव व कार्निव्हल या महोत्सवाच्या आयोजनसंदर्भात बैठक घेण्याचा निर्णय घेत येत्या 23 रोजी सकाळी पालिका मंडळाच्या विशेष बैठकीचे पत्र उशिरा नगरसेवकांना दिले.

    पालिका कायद्यानुसार हा प्रकार बेजबाबदारपणाचा म्हणावा लागेल. त्यामुळे पालिकेच्या एकंदरीत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

Mapusa Municipality|Goa Politics
Mahadayi Water Dispute: 'मुख्यमंत्र्यांना म्हादई बचावपेक्षा त्यांची खुर्ची टिकवण्यामध्ये स्वारस्य'
  • सध्या पालिका संचालकांनी नगराध्यक्षांचा राजीनामा स्वीकारला व त्यांनी या पदाचा पदभार उपनगराध्यक्षांकडे सोपवण्याचा आदेशही जारी केलेला नाही.

    त्यामुळे हा पदभार संचालकही आपल्याकडे ठेवू शकतात आणि तीन दिवसानंतर नवीन नगराध्यक्षांच्या निवडीची नोटीस जारी करू शकतात. मंगळवार किंवा बुधवारी या रिक्त पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

  • पालिका मंडळाची बैठक 23 रोजी होण्याची शक्यता आहे. नवीन नगराध्यक्षांची पदी वर्णी लागल्यानंतर संबंधित नगराध्यक्ष चोवीस तासांपूर्वी खास बैठकीची नोटीस काढू शकतो. मात्र ही बैठक आयोजित करण्याची इतकी घाई कशासाठी? असा सवाल काही नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com