
म्हापसा : प्रजापती ब्रह्माकुमारी आंतरराष्ट्रीय विश्व विद्यालय मुख्यालयातील खाद्य विभागाचे व्यवस्थापक सूरज भाईजी हे येत्या रविवार 21 ते गुरुवार 25 मे दरम्यान गोवा दौऱ्यावर येणार आहेत. म्हापशात त्यांचे ध्यान शिबिर व लोकसंवादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती गोवा-सिंधुदुर्ग विभागाच्या संचालिका शोभा बहनजी यांनी दिली.
शुक्रवारी येथील ब्रह्माकुमारीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्या समवेत सुरेखा बहनजी या उपस्थित होत्या. या दौऱ्यावर सूरज भाईजी यांच्या सोबत ब्रह्माकुमारीच्या लेखिका व वक्त्या गीता बहनजी असेल.
गोवा दौऱ्यापूर्वी 21 रोजी सकाळी सूरज भाईजी वेंगुर्ला येथे ब्रह्माकुमारीच्या सुखसमाधान या कार्यालयाचे उद्घाटन करतील. त्यावेळी तेथील मंत्री, आमदार, नगराराध्यक्ष व प्रतिष्ठित लोक उपस्थित असतील. उद्घाटन सोहळ्यानंतर तेथे त्यांचा मेडीटेशनचा कार्यक्रम होईल.
त्यानंतर रात्री सूरज भाईजी त्यांचे गोव्यात आगमन होईल. सोमवार दि. 22 रोजी म्हापशातील कार्यालयात पहाटे 4 ते 4.45 दरम्यान त्यांचे मेडीटेशनचा कार्यक्रम होईल. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत ध्यान शिबिर होईल. 23 रोजी पहाटे 4 पासून ध्यानचा कार्यक्रम वेर्ला-बार्देश येथील कार्यालयात होईल.
संध्याकाळी ५ ते 7.30 वा. म्हापशातील हनुमान नाट्यगृहात ब्रह्माकुमारीच्या सकारात्मक परिवर्तन उपक्रमाअंतर्गत सूरज भाईजींचा लोकसंवादाचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्रीगणांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे, तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती शाभा बहनजी यांनी दिली.
24 रोजी ब्रह्माकुमारीच्या प्रमुखांसाठी ध्यानचे शिबिर सूरज भाई व गीता बहनजी घेतील. त्यानंतर गुरूवार 25 रोजी ते माघारी आबूधाबीला रवाना होतील, असेही शोभा बहनजी यांनी सांगितले.पाण्याच्या नियोजनाविषयी जनजागृती व आवश्यक उपक्रम या अभियानामार्फत हाती घेतले जाईल. सकारात्मक परिवर्तन या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जात आहे, अशी माहितीही शोभा बहनजी यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.