Goa Garage: म्हापसा नगरपालिका गॅरेज प्रकल्प पुढील वर्षात मार्गी

Goa Garage: महसूल निर्माण करणारा प्रकल्प आहे, जो पालिकेचा महसूल वाढवेल.
Garage Project
Garage ProjectDainik Gomantak

Mapusa: म्हासपा येथील पालिका गॅरेज प्रकल्प हे व्यावसायिक संकुल मागील तीन वर्षांपासून अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम गोवा राज्य नागरी विकास एजन्सीद्वारे केले जात आहे. हा प्रकल्प आता मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हापसा नगरपालिका गॅरेजच्या पुनर्विकासाचा प्रकल्प सध्या सुरू आहे. हा महसूल निर्माण करणारा प्रकल्प आहे, जो पालिकेचा महसूल वाढवेल.

सतरा ते अठरा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता असलेल्या या प्रकल्पाला कोविड महामारीसह विविध अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. ज्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम झाला. आता हळुहळू अडथळ्यांवर मात करत या प्रकल्पाचे बांधकाम सध्या सुरू आहे आणि ते पूर्ण होऊन मार्च 2025 पर्यंत म्हापसा पालिकेकडे सुर्पूद होण्याची अपेक्षा आहे.

Garage Project
Goa Tourist Places : गोव्यातील या पर्यटनस्थळांना भेट देऊन वाढेल तुमच्या सहलीचा आनंद!

2019 मध्ये नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी 20.5 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. या प्रस्तावित व्यावसायिक प्रकल्पाचा आराखडा आर्किटेक्ट (Architect) अश्विनीकुमार प्रभू यांनी तयार केला होता. ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 1665 चौरस मीटर आहे. 2015 मध्ये हा प्रकल्प (Projesct) प्रस्तावित केला होता.

* सहा मजल्यांचा प्रकल्प

म्हापसा (Mapusa) पालिका गॅरेज प्रकल्प तळमजल्यासह सहा मजल्यांचा आहे, ज्याला बेसमेंटमध्ये पार्किंगची सुविधा असेल. या व्यावसायिक इमारतीत तळमजल्यावर, सुमारे सात आणि पहिल्या मजल्यावर सुमारे 14 दुकाने असतील व दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कार्यालये असतील.

Garage Project
Goa Congress: काँग्रेस संघटनेत तीव्र असंतोष

* कोविडमुळे कामात अडथळा

जीसुडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोविडमुळे या कामावर परिणाम झाला होता. मात्र, आता आम्ही 60 टक्के काम पूर्ण केले आहे आणि मार्च 2023 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून पालिकेला सुपूर्द केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com