Mapusa Police: वाहन चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना म्हापसा पोलिसांनी केली अटक

वाहन चोरी प्रकरणात केली कारवाई
Mapusa Police
Mapusa PoliceDainik gomantak

म्हापसा येथे काही दिवसांपूर्वी वाहन चोरीचा प्रकार घडला होता. याबाबत उदय सावंत यांनी म्हापसा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार उदय सावंत यांच्या घरी वाहन चोरण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला होता. या तिघांपैकी दोघांना स्थानिकांच्या मदतीने त्यांनी पकडले. तर एक पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

(Mapusa Police have arrested 3 accused persons who attempting to commit theft of parked vehicles from the Uday Sawant home )

Mapusa Police
Goa Congress: काँग्रेसने पुनर्बांधणीसाठी कसली कंबर; सर्व गट समित्यांची करणार पुन्हा स्थापना

याबाबत त्यांनी म्हापसा पोलिसात तक्रार दाखल केली होती. याबाबत माहिती देताना म्हापसा पोलिसांनी तिसऱ्या आरोपीचा शोध संपला असून त्याला अटक केल्याची माहिती दिली. या गुन्ह्यातील संशयित आरोपींची ओंकार चारी, योगेश मोल्लेकर दोघेही वाळपोईचे रहिवासी आणि कृष्णजित नाईक राहणार फोंडा, अशी नावे आहेत.

Mapusa Police
Goa Politics: पक्षांतरावर सुदिन ढवळीकर म्हणतात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’

तिसऱ्या आरोपीला आज पोलिसांनी आज पकडले आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून दोन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईच्या शोध पथकात हेड कॉन्स्टेबल अल्विटो डीमेलो, केशव नाईक, कॉन्स्टेबल राजेश कानोलकर, आनंद राठोड यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com