Shigmotsav 2023 : म्हापशात शिगमोत्सव रविवारीच व्हावा!

नागरिक संतापले : परंपरा कदापि मोडणार नाही; उपसभापतींना साकडे
Goa Carnival 2023 | Margao
Goa Carnival 2023 | Margao Dainik Gomantak

Shigmotsav 2023: मागील 40 वर्षांपासून म्हापसा शिगमोत्सव रविवारीच साजरा केला जातो. या शिगमोत्सवाला धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. मात्र, यंदाचा शिगमोत्सव रविवारऐवजी सोमवारी आयोजित केल्यामुळे म्हापसावासी संतापले.

अशावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी मुख्यमंत्री तसेच पर्यटनमंत्र्यांची समजूत काढून शिगमोत्सव मिरवणूक रविवारीच आयोजित करा, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक तुषार टोपले यांनी केली.

Goa Carnival 2023 | Margao
गोवा सरकारच्या अर्थसंकल्पाकडून तुम्हाला काय पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी लोकांकडून मागविल्या सूचना

गुरुवारी (ता.२), तुषार टोपले यांच्या नेतृत्वाखाली काही जागरूक स्थानिकांनी उपसभापतींची म्हापसा पालिकेत भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. यावेळी माजी नगरसेवक नारायण राटवड, राजू तेली, सचिन किटलेकर, एकनाथ म्हापसेकर, श्रीपाद येंडे, अच्युत वेर्णेकर उपस्थित होते.

शिगमोत्सवानिमित्त निघणारी रोमटामेळ, लोकनृत्य व चित्ररथ मिरवणूक हा धार्मिक उत्सव आहे. तो कोणत्या दिवशी साजरा करावा, यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. गेली ४० वर्षे ही मिरवणूक रविवारीच निघायची. मात्र यंदा सोमवार, १३ मार्च रोज मिरवणूक जाहीर केली आहे. ती परंपरेला धरून नाही, असे टोपले म्हणाले.

Goa Carnival 2023 | Margao
Goa Congress : काँग्रेसची उद्यापासून ‘हात से हात जोडो’ मोहीम

खरी गोम : पर्वरीसाठी म्हापशाला डावलले

पर्वरी येथे नव्याने सुरू होणाऱ्या शिगमोत्सवाला रविवारचा दिवस देऊन म्हापसावासीयांना डावलल्याने याविषयी खोर्ली-सीम येथील श्री राष्ट्रोळी मंदिरात बुधवारी सायंकाळी एका बैठकीचे आयोजन करून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

"म्हापशातील नागरिकांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे मी ऐकून घेतले. हा प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीन. त्याचप्रमाणे याविषयी शिष्टमंडळास एक निवेदन सादर करण्याची विनंती केली आहे."

- जोशुआ डिसोझा, उपसभापती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com