म्हापसा कोर्ट जंक्शनवरील सिग्नल नव्हे ‘डोकेदुखी’

वाहनचालकांत संभ्रम : लाल, हिरवा दिवा कधी पेटतो, कधी पेटतच नाही
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak

म्हापसा : येथील कोर्ट जंक्शनवरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी स्वचंलित वाहतूक सिग्नल्स लावले आहेत. मात्र, त्यांची देखभाल केली जात नसल्याने तो योग्यरित्या काम करत नाही. त्यामुळे एकाच वेळी लाल व हिरवे दिवे लागतात. तर कधीकधी ते दिवेच दिसत नाहीत. परिणामी, वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. सिग्नलच्या देखभालकडे पालिकेने लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांसोबत वाहनचालकांतून होत आहे.(Mapusa News)

सध्या म्हापसा पालिका मंडळाने कोर्ट जंक्शन तसेच पेडे जंक्शनवर सीएसआर उपक्रमांतर्गत या दोन्ही ठिकाणी नवीन ट्रॅफिक सिग्नल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने ठराव घेतला आहे.

शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी म्हापसा पालिकेने कोर्ट जंक्शनवर प्रामुख्याने हा ट्रॅफिक सिग्नल बसविला. हे सिग्नल बसून बरीच वर्षे उलटली आहेत. मात्र, हा सिग्नल देखभालीअभावी तो नेहमीच बंद पडण्याच्या तक्रारी येतात.

सध्या या सिग्नलचे दिवे व्यवस्थित पेटत नाहीत. तर काहीवेळा लाल व हिरवा दिवा दिसत नसतो. त्यामुळे वाहनधारकांत गैरसमज होतात. अनेकदा सिग्नल लागला की सुटला,हेही कळत नसल्याने चालक थांबतात. त्यामुळे सिग्नल धोकादायक बनला आहे.

Mapusa News
गोव्यात पूर्वतयारी शिक्षणाचा अवलंब; सरकारचा निर्णय

दुरुस्तीनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या...

मध्यंतरी हा सिग्नल पालिकेने अनेकदा दुरुस्त केला. मात्र, काही दिवसांतच तो पुन्हा नादुरुस्त होतो. गेल्या पावसाळ्यात या सिग्नलवर वीज पडल्याने तो जळला होता. त्यामुळे काही महिने ही सिग्नल यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडली होती. त्यानंतर, तो दुरुस्त केला खरा, पण देखभालअभावी या सिग्नलमध्ये नेहमीच बिघाड येत राहते.

पालिकेकडून तक्रारींकडे कानाडोळा

कोर्ट जंक्शनवर परिसरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेकडे लक्ष देऊन ती व्यवस्थित दुरुस्त केली जावी, यासंदर्भात म्हापसा वाहतूक पोलिसांकडून सहा महिन्यांपासून म्हापसा पालिकेला स्मरणपत्रे पाठविली जाताहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com