म्हापशातील चोरीचा 24 तासात छडा लावला

म्हापशातील चोरीप्रकरणी तीन परप्रांतीय तरुणांना बेड्या; तीन मोबाईलसह रोकडही हस्तगत
म्हापशातील चोरीचा 24 तासात छडा लावला
Mapusa theft accused arrested within 24 Hours

म्हापसा : म्हापसा येथे रिझिम प्लाझा इमारतीमध्ये काल गुरुवारी झालेल्या चोरी प्रकरणाचा म्हापसा पोलिसांनी 24 तासांच्या आत छडा लावला आहे. या चोरीप्रकरणी रमेश सत्या उर्फ वडार ( रा. विजापूर), संजय बाने (रा. लातूर) आणि महम्मद शेख (रा. गदग) या तीन परप्रांतीय तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणांकडून तीन मोबाईल आणि काही रोकडही जप्त केली आहे.

मरड-म्हापसा येथील ‘रिझीम प्लाझा’ इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील मिलाग्रीस सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाबरोबरच अन्य तीन कार्यालये चोरट्यांनी फोडून चार मोबाईल व सुमारे पंचवीस हजार रूपयांची रोकड मिळून अंदाजे सत्तर हजारांचा ऐवज लंपास केला होता.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर तपासाची चक्र जलदगतीने फिरवत पोलिसांनी 24 तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Mapusa theft accused arrested within 24 Hours
मडगावातील 'कॅनरा बॅंक' फसवणूकप्रकरणी महिलेला अटकपूर्व जामीन

म्हापशातील चोरीची ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली होती. त्या इमारतीमध्ये सुरक्षारक्षक तसेच अन्य कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याच्या संधीचा लाभ उठवत चोरट्यांनी स्वत:चा कार्यभाग उरकला होता. त्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर मिलाग्रीस सहकारी पतसंस्थेची मुख्य शाखा आहे. सकाळी कर्मचारी येताच कार्यालयाचा दरवाजा सताड उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या सर्वांनी आत जाऊन बघितले असता कार्यालयाती सर्व कागदपत्रे विखुरलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. तसेच टेबलांचे खणही (ड्रॉव्हरही) भूभागावर होते. त्या कार्यालयातील एक मोबाईल तसेच सुमारे अडीच हजारांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांना नंतर आढळून आले.

Mapusa theft accused arrested within 24 Hours
गोंयचो सायब वादावर मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

बँक कार्यालयाच्या बाजूला असलेले अ‍ॅड. शंकर चोडणकर यांचे कार्यालय, जवळच असलेले बाबल धारगळकर यांचे कार्यालय तसेच त्याच मजल्याच्या दुसऱ्याच्या बाजूने असलेले अ‍ॅड. फ्रान्सिस ब्रागांझा यांचे कार्यालयही फोडल्याचे दिसून आले. पतसंस्थेचे व्यवस्थापक फ्रान्सिस सिल्वेरा यांनी या चोरीची माहिती म्हापसा पोलिसांना दिली असता पोलिस उपनिरीक्षक विभा वळवईकर आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अ‍ॅड. शंकर चोडणकर यांच्या कार्यालयातील एक मोबाइल आणि पंधरा हजार रुपये रोकड, बाबल धारगळकर यांच्या कार्यालयातील एक मोबाईल आणि तीन हजार रुपये रोकड, तर अ‍ॅड. विनिशा ब्रागांझा यांच्या कार्यालयातील एक मोबाईल आणि पाच हजार रोकड चोरीस गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.