अवैध वाहन पार्किंगविरुद्ध म्हापसा वाहतूक पोलिस 'ॲक्शन' मोडमध्ये

करासवाडा ते कोलवाळ बिनानी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा काही वाहने पार्क केलेली दिसून येतात.
Mapusa Traffic Police
Mapusa Traffic PoliceDainik Gomantak

गोव्यात अनेक ठिकाणी अवैध पार्किंगची समस्या डोके वर काढू लागली आहे. यासंबंधी अॅक्शन मोडवर येत म्हापसा वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.

Mapusa Traffic Police
IFFI Goa: इफ्फीत इंडियन पॅनोरमा विभागासाठी प्रवेशिका घेण्यास सुरूवात

करासवाडा ते कोलवाळ बिनानी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा काही वाहने पार्क केलेली दिसून येतात. या ट्रकमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यामुळे म्हापसा वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोव्यात रस्ता सुरक्षा परिषद आणि समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2019 पासून आजपर्यंत रस्ता सुरक्षा निधीचे एकूण 3.34 कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. त्यापैकी गेल्या तीन वर्षांत फक्त 80 लाख 92 हजार रुपये खर्च झालेत. म्हणजेच एकूण निधीच्या 24 टक्के रकमेचा वापर झाला आहे. याबाबतचे लेखी उत्तर वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com