Joshua D'Souza : पाच वर्षांत म्हापशाचा करणार कायापालट

विरोधकांना बोलण्याची संधी देणार नाही
Joshua D'Souza
Joshua D'SouzaDainik Gomantak

म्हापसा : येथील मतदारसंघात अपेक्षित विकास झाला नाही, असे हिणवले जाते. मात्र, येत्या पाच वर्षांत म्हापसा शहराचा कायापालट होईल व विरोधकांना बोलण्याची एकही संधी राहणार नाही, असे सांगत उपसभापती तथा आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी आपल्या कार्यकाळात रवींद्र भवनाचा प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Joshua D'Souza
Vasco Damodar Saptah : दामोदर भजनी सप्‍ताहाची सांगता

बुधवारी सायंकाळी उशिरा म्हापसा येथील उत्तर गोवा भाजपा जिल्हा कार्यालयात म्हापसा भाजपा मंडळातर्फे जोशुआ यांची उपसभापती निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, सुशांत हरलमकर, रुपेश कामत, श्रीकृष्ण पोकळे, राजसिंह राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले, नुकतेच आम्ही तार पुलाचे लोकार्पण केले असून हे काम करताना तेथील एकाही बांधकामास हात लावला नाही. तसेच आंतराराज्य नवीन बसस्थानक कार्यान्वित केले. सध्या भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम सुरू आहे. त्याशिवाय या पाच वर्षांत रवींद्र भवनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. म्हापशात किंवा शहराच्या सीमेवर या भवनाची पायाभरणी करणार, असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com