
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलणे व नवीन बांधकामांना परवानगी देतेवेळी पर्यावरण तसेच वनसंपदेचे नुकसान होणार नाही या गोष्टींकडे लक्ष देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मार्ना-शिवोली ग्रामसभेत घेण्यात आला. सरपंच अभय शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
यावेळी उपसरपंच मनोरमा गोवेकर, पंच फेर्मिना फर्नांडिस, शोभावती चोडणकर, शर्मिला वेर्णेकर, सिंपल धारगळकर, अमित मोरजकर, विलियम्स फर्नांडिस, पंचायत सचिव अस्मिता परब उपस्थित होत्या. कांदोळकर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. वाडी-शिवोलीत एका स्थानिकाकडून गेल्या महिनाभरात डोंगरकापणीसह मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आल्याच्या तक्रारीवरून ग्रामसभेत गोंधळ माजला.
त्यावर सरपंच शिरोडकर यांनी येत्या एक-दोन दिवसांत त्या जागेची पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. खारफुटीच्या बेकायदा कत्तलप्रकरणी सीआरझेड प्राधिकरणाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत पंचायतीच्या भूमिकेकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पोलिसांना करावी लागली मध्यस्थी
ग्रामस्थ उद्देश पांगम, ज्योकिम डिसोझा, ग्रेगरी डिसोझा, सचिन रेवोडकर, महेश धारगळकर यांनी ग्रामसभेत विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित केले. मधलेभाट-शिवोली येथील जुन्या रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थ व पंचायत मंडळात शाब्दिक चकमक उडाल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना सभागृहात धाव घ्यावी लागली.
शेवटी सरपंच अभय शिरोडकर यांनी सदर रस्ताकामाची पाहणी उद्या सोमवारी करण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले आणि प्रकरण मिटवले. सभेला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.