मराठी चित्रपट ‘पगल्या’ इफ्फीमध्ये झळकणार..

मराठी चित्रपट ‘पगल्या’ इफ्फीमध्ये झळकणार..
Marathi film paglya to be screened in International Film Festival of India

पणजी : निर्माते-दिग्दर्शक विनोद पीटर यांचा ‘पगल्या’ हा मराठी चित्रपट यावर्षीच्या गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार आहे, अशी माहिती विनोद पीटर यांनी स्वतः दिली आहे. 


एका लघुपटासाठी डॉ. सुनिल खराडे यांनी ‘पगल्या’ची कथा लिहिली होती. कथा हाती पडल्यानंतर यावर चांगला चित्रपट होऊ शकतो हा विचार माझ्या मनात आला. ‘पगल्या’ ही दोन मुलांची म्हणजेच वृषभ आणि दत्ता यांची गोष्ट आहे. 


वृषभ हा शहरी भागातला, तर दत्ता हा ग्रामीण भागातला असतो.  दोघे एकमेकांना कधीच भेटले नाहीत, परंतु दोघांनाही कुत्रा पाळण्याची खूप इच्छा होती. वृषभला भेट म्हणून कुत्रा मिळतो. एक दिवस वृषभकडून हा कुत्रा हरवतो आणि तो दत्ताला सापडतो. 
लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट  इटली, भारत, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील १९ चित्रपट महोत्सवात चित्रपट स्वीकारला जाणे, हे पहिल्याच टप्प्यातील मोठे यश आहे. कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड प्रिमीयर फिल्म अॅवॉर्डस या पुरस्कार सोहळयात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.

अधिक वाचा :

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com