Margao News: अधिवेशनानंतर कामांना गती : कामत

आगाळी प्रभागातील विकास काम हे 17 लाख रुपयांचे असून या भागातील सर्वांना त्याचा लाभ होईल
Commencement Of Development Work
Commencement Of Development WorkGomantak Digital Team

Margao News : मडगावबद्दल ज्या मागण्या आहेत त्या सर्व विकासकामासंदर्भात आहेत व सरकारने त्या सर्व मान्य करून मंजुरीही दिली आहे. त्यामुळे अधिवेशनात मडगावचे प्रश्र्न विचारण्याचा प्रश्र्नच संभवत नाही.

अधिवेशनानंतर सर्व कामे वेगाने पूर्ण केली जातील, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी पत्रकारांना सांगितले. फातोर्डा येथील मिलाग्रीन गोम्स या नगरसेविकेच्या आगाळी येथील प्रभाग 7 मधील विकासकामाचा शुभारंभ केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Commencement Of Development Work
Margao Garbage Problem: कचरा समस्येवर मे महिन्याच्या आसपास तोडगा काढू; दिगंबर कामतांचे आश्वासन

आगाळी प्रभागातील विकास काम हे 17लाख रुपयांचे असून या भागातील सर्वांना त्याचा लाभ होईल. रावणफोंड येथे 7 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सहा पदरी उड्डाणपुलाची पायाभरणी लवकरच केली जाईल. नंतर रावणफोंड जंक्शन ते खारेबांद पर्यंतच्या रस्ता दुरुस्ती, पदपथ, सौंदर्यीकरण 11 कोटी खर्चून केले जाईल व या कामाचा शुभारंभ 4 एप्रिल रोजी होईल,असेही त्यांनी जाहीर केले.

Commencement Of Development Work
Ponda Development : विकास प्रस्तावांना केवळ १५ दिवसांत मंजुरी

प्रभाग 7 मधील विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी माजी आमदार दामू नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मिलाग्रीन गोम्स, कामिल बार्रेटो, श्र्वेता लोटलीकर, राजू नाईक हे नगरसेवक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com