मडगाव नगरसेवकांकडून प्रभागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

पालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी स्थानिक आमदारांच्या सहकार्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नावेली: कोरोना महामारीच्या काळात मडगाव पालिकेतील नगरसेवकांनी पालिकेत प्रत्यक्षात न येता नगराध्यक्ष व पालिका मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रभागातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. लॉकडाऊन काळात प्रभागातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप घराघरांत करण्यात आले. तसेच ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

पालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी स्थानिक आमदारांच्या सहकार्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपण विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या सहकार्याने आपल्या प्रभागातील लोकांना लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरवातीला मोफत केले, तर त्यानंतर घराघरांत जाऊन त्यांना आवश्यक असलेले सामान खरेदी करून पोहचवण्यात आले. हे सर्व करताना प्रभागातील कामांवर दुर्लक्ष केले नाही. जशी शक्य होतील तशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात पालिका कामगार अर्धवेळ कामाला येत असल्याने प्रभागातील कामे पूर्ण करणे शक्य नसल्याने आपण स्वतः खासगी कामगार प्रभागात वापरून कामे पूर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक दामोदर नाईक यांनी कोरोना टाळेबंदीच्या काळात तसेच त्यानंतर आपण जास्तीत जास्त नगराध्यक्षा पुजा नाईक व पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधून आपल्या प्रभागातील कामांसंदर्भात चर्चा केली. काहीवेळा पालिकेकडून कमी प्रमाणात कामगार मिळाले. त्यामुळे आपल्याला खासगी स्वतःचे कामगार वापरावे लागले. टाळेबंदीच्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आल्या.  प्रभागातील लोकांनी आपल्या जीवाची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व आजही ते काम सुरू आहे. या स्थानिक आमदार कामत यांच्याकडून सहकार्य मिळत गेले. त्यामुळे प्रभागातील लोकांची कामे वेळेवर पूर्ण करणे शक्य झाले, असे नगरसेवक नाईक यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या