मडगावच्या मासळी मार्केटची अवस्था बिकट

अस्वच्छतेचे आगर ; परिसर बनला चिखलमय
मडगावच्या मासळी मार्केटची अवस्था बिकट
Fish Market Dainik Gomantak

सासष्टी : एसपीडीएच्या मडगाव मधील घाऊक व किरकोळ मासळी मार्केटची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ही दोन्ही मार्केट म्हणजे कचऱ्याचे, बेशिस्तीचे, अस्वच्छतेचे आगर बनले आहे. त्यातच पावसामुळे येथील परिसर चिखलमय झाला आहे.

Fish Market
ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे अग्निपथ योजनेविरोधात आझाद मैदानावर निदर्शने

घाऊक मार्केटच्या बाजूने रस्ता आहे जो पश्र्चिम बगल रस्त्याला जोडलेला आहे. त्यामुळे येथे वाहतूक जास्त प्रमाणात होत आहे. या सर्व परिस्थिती मुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मार्केटच्या जागेत बांधकाम चालू आहे. त्यामुळे मासळी विक्रेते, फळभाजी विक्रेते रस्त्यावर बसून विक्री करताना दिसतात. मासळी घेण्यास येणारे ग्राहक दुचाकी, कार आदी वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे ठेवतात. त्यातच आता रस्त्यालगत गाडे उभारले जाताहेत. त्याचा परिणामही वाहतूक व ग्राहकांच्या हालचालींवर होतो. एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी मार्केटची पाहणी करून सूचना केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवस स्वच्छता दिसली. पण आता ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com