Margao Graveyard : कित्येक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मडगाव येथील कब्रस्थानाचा तिढा सुटला; महेश आमोणकर

Margao Graveyard Latest News : मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.
Margao Graveyard Latest News
Margao Graveyard Latest NewsDainik Gomantak

फातोर्डा : न्यायालयाने दिलेल्या आदेशात सोनसोडो येथील कब्रस्तानचा प्रश्न निकालात काढल्याबद्दल या मागणीसाठी उपोषणास बसलेले मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. कित्येक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मडगावच्या मुस्लिम बांधवांना न्याय मिळाला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

(Margao Graveyard Latest News)

Margao Graveyard Latest News
Govt servants: बार्देश, सासष्टीत सर्वाधिक 'सरकारी बाबू', लोकसंख्येच्या तुलनेत सत्तरी अव्वल

आज मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत महेश आमोणकर यांनी सांगितले, न्यायालयाच्या या आदेशाने मुस्लिम बांधवाना न्याय मिळाला आहे. पुढे ते म्हणाले की, सोनसोडोवरील कब्रस्थानासाठी राखीव ठेवण्यात आलेली जागा काही जणांकडून सेटलमेंट झोन मध्ये बदल करून घशात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

त्याऐवजी खारेबांद या ठिकाणी असलेली जागा कब्रस्थानसाठी संपादित करावी अशी हालचाल त्यांच्याकडून करण्यात येत होती. हाच मुद्दा घेऊन आपण मडगाव नगरपालिकेसमोर उपोषणही केले होते. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घडवून आणली आणि मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न एका वर्षात निकालात काढण्याचे आश्वासन दिले होते याची पूर्तता त्यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच स्थानिक आमदार दिगंबर कामत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

यावेळी मुस्लिम बांधव रियाझ तुर्की यांनी कब्रस्थानचा प्रश्न निकालात काढल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. न्यायालयाच्या आदेशानुसार कब्रस्थानचा प्रश्न सहा महिन्याच्या आत निकालात काढायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com