Margao News : मडगावातील मिनी डंपला आग; रहिवाशांची घुसमट

पालिकेचे लक्ष मात्र सोनसोडोवरच
Margao Mini Dump
Margao Mini DumpGomantak Digital Team

मडगाव कदंब बसस्थानका जवळील कच-याच्या मिनीडंपला लागलेल्या आगीचा सर्वाधिक त्रास त्या परिसरांतील रहिवाशांना सलग दोन दिवस झाला. मात्र, या आगीकडे गंभीरपणे पहाण्याचे सोडून नगरपालिका सोनसोडोवर अधिक भर देत असल्याचा आरोप या रहिवाशांनी केला आहे.

शनिवारी लागलेली आग रविवारी रात्रीपर्यंत पूर्णतः शमली नव्हती व त्यामुळे त्यातून येणारे धुराचे लोट त्या परिसरांत रविवारीही पसरले होते. आगीवर केवळ पाण्याचे फवारे पारून भागणार नाही, हे लक्षात येताच अग्नीशमन दलाने पालिकेला त्यावर माती टाकण्याचा व ती त्वरित आटोक्यात आणण्याचा पर्याय सुचवला होता.

पण ती येण्यास रविवार सायंकाळ उजाडली व त्यामुळे आग अधिककाळ धुमसत राहिली, असे सांगितले जाते.

Margao Mini Dump
Damodar Mauzo : सोशल मीडिया बनलाय आपला गुरु; दामोदर मावजो यांचे प्रतिपादन

गेले दोन दिवस आगीने थैमान माजविलेले असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ वा आपत्कालीन विभाग या पैकी कोणीच तेथे फिरकले नाहीत. याबद्दल खुद्द नगरसेवक आश्चर्य व्यक्त करत आहेत.नगरपालिकेने या आगीबद्दल अजून कोणतेच भाष्य केलेले नाही.

मात्र, खासगीत उच्च न्यायालयामुळे आपला सारा भर सध्या सोनसोडोवर असल्याचे ते कबूल करतात. कदंब बसस्थानकाजवळ यापूर्वीच्या आगीचा अनुभव असताना इतका कचरा साठू का दिला, यावर कुणी काहीच सांगत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com