मडगावातील ज्वेलर्सचा दिवसाढवळ्या सुरा भोसकून खून

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

मडगावातील क्रिश्नी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा दिवसाढवळ्या चोरीसाठी आलेल्या चोरांनी सुरा भोसकून खून केला. हा प्रकार आज भरदुपारी मडगाव बाजारात घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. 

मडगावातील क्रिश्नी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा दिवसाढवळ्या चोरीसाठी आलेल्या चोरांनी सुरा भोसकून खून केला. हा प्रकार आज भरदुपारी मडगाव बाजारात घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. 

स्वप्नील वाळके जखमी अवस्थेत चोरांना अडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा हात झटकून चोरटे पळून जात असल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्वप्नील वाळके भाजप कार्यकर्त्या क्रिश्नी वाळके यांचा मुलगा आहे. दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने भाजपचे प्रवक्ते रुपेश महात्मे यांनी मडगाव शहरात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला आहे. तर भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी वाळके यांच्यावरील खुनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

मडगांव पोलिसांनी त्वरित कारवाई करून या खुनी हल्ल्यात सहभागी व्यक्तीनां ताबडतोब अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी पोलीस संशयितांचा शोध घेत आहे.

संबंधित बातम्या