Margaon Municipality अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई

मडगाव नगरपालिकेने मडगाव मार्केट परिसरात फूटपाथवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे वस्तूंची विक्री करणाऱ्यावर कारवाई करून सर्व माल हस्तगत केला आहे.
Margao Municipal action against encroaching vendors
Margao Municipal action against encroaching vendorsDainik Gomantak

फातोर्डा: मडगाव नगरपालिकेने मडगाव मार्केट परिसरात फूटपाथवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे वस्तूंची विक्री करणाऱ्यावर कारवाई करून सर्व माल हस्तगत केला आहे. ही कारवाई सकाळच्या सत्रात मुख्यधिकारी रोहित कदम यांच्या आदेशानुसार मडगाव नगरपालीकेचे मार्केट इन्स्पेकटवर सांतु फेर्नांडीस आणि शेखर गावकर यांनी केली आहे.

(Margao Municipal action against encroaching vendors)

Margao Municipal action against encroaching vendors
विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने 12 लाखांचा गंडा

दोन दिवसापूर्वी गोमंतक वृत्तपत्रात मडगाव मार्केट परिसरात फूटपाथ अडवून बेकायदेशीर व्यवसाय करण्यात येत असल्या बद्दल वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

आजच्या दिवशी मडगाव नगरपालिकेने सडेकर लाईन या ठिकाणी फूटपाथवर अतिक्रमण करून वस्तूंची विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे . यात एकंदरीत 15 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे . नंतर या वस्तू पाजिफोंड येथील अनाथ आश्रमाला देण्यात आला . या कारवाई विषयी मडगाव येथील दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे . या पुढे अशीच ही कारवाई सुरु राहणार असल्याचे मुख्यधिकारी रोहित कदम यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com