मडगाव नगरपालिकेला 117 वर्षे पूर्ण !

प्रशासनाकडून दुर्लक्ष: डागडुजी, रंगरंगोटीकडे डोळेझाक
मडगाव नगरपालिकेला 117 वर्षे पूर्ण !
Margao Municipal Council Dainik Gomantak

फातोर्डा: मडगाव येथील नगरपालिकेला 30 एप्रिल रोजी 117वर्षे पूर्ण झाली असून या पालिका इमारतीची देखभाल करण्यात पालिका प्रशासनाकडून अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याचे उघडकीस आले आहे. पालिका इमारतीचा 117 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी नगरपालिकेने कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नाहीच, शिवाय या इमारतीची रंगरंगोटीही केली नसल्याने मडगाव शहरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या इमारतीला ऐतिहासिक महत्त्व असल्याने याची दखल नगर मंडळाने घ्यायला हवी होती अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

मडगाव पालिका इमारतीला एक वारसामूल्य आहे. 27 सप्टेंबर 1902 रोजी या वास्तूच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली होती. यानंतर या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 30 एप्रिल 1905 रोजी ही इमारत जनतेच्या सेवेसाठी खुली करण्यात आली होती. याला आता 117वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, या दिवसाचे औचित्य साधून कोणताही कार्यक्रम नगरपालिकेने आखला नसल्याने तसेच या वस्तूची रंगरंगोटी केली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.