कचऱ्याच्‍या विल्‍हेवाटीसाठी मडगाव पालिकेला हवी जागा

टाकाऊ कचरा साचला: पावसाळ्‍यात स्‍थिती गंभीर बनण्‍याची भीती
Sonsodo waste Project
Sonsodo waste ProjectDainik Gomantak

मडगाव: गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सोनसोडो डंप यार्डवर रेमेडिएशन प्रक्रिया करून राहिलेल्‍या टाकाऊ कचऱ्याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी मडगाव नगरपालिकेकडे जागाच नाही. हा कचरा टाकण्यासाठी पालिका जमिनीच्या शोधात आहे.

मान्सूनच्या आगमनापूर्वी सुमारे 1000 ट्रक असलेला हा टाकाऊ कचरा इतर ठिकाणी टाकण्यासाठी मडगाव नगरपालिकेला जमीन शोधावी लागणार आहे. अन्यथा पावसाच्या पाण्याबरोबरच हा कचरा वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे पालिका आता खासगी जमीनमालकांशी हातमिळवणी करून त्यांना जमीन भरण्यासाठी काढून ठेवलेला कचरा घेण्याची विनंती करत आहे. कचरा व्यवस्थापन मंडळाने शनिवारी जुन्या प्रक्रिया प्लांटमधील कचरा हटविण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा म्हणाले की, कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या मदतीने जुना कचरा कमी होत आहे. परंतु त्याचवेळी पालिकेला टाकाऊ कचरा टाकण्यासाठी जमीन अद्याप मिळालेली नाही. यापूर्वी मडगाव येथील कदंब वाहतूक महामंडळाच्‍या मालकीच्या जमिनीचा वापर करण्यात आला होता, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com