Margao News : दवर्ली जमीन हडप प्रकरणातील संशयित दोड्डामणीला जामीन

दुसरा संशयित राजदीप कुंडईकरला १२ जूनपर्यंत दिलासा
Margao News
Margao News Gomantak Digital Team

दवर्ली जमीन हडप प्रकरणातील संशयित दोड्डामणीला जामीन

दुसरा संशयित राजदीप कुंडईकरला १२ जूनपर्यंत दिलासा

मृत झालेल्या नोटरीच्या नावे बनावट शिक्के तयार करून तसेच बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे मडगाव येथील एका वृद्ध कपड्याच्या व्यापाऱ्याची दवर्ली येथील जमीन हडप करण्याचा आरोप असलेला या प्रकरणातील सूत्रधार सलीम दोड्डामणी याला आज मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाने २५ हजारांच्या जामिनावर मुक्त केले.

या प्रकरणातील दुसरा संशयित राजदीप कुंडईकर हा अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. आज त्याला तात्पुरता दिलासा देताना १२ जूनपर्यंत पोलिसांनी त्‍याला अटक करू नये असे निर्देश न्यायालयाने मडगाव पोलिसांना दिले आहेत. मध्यंतरी संशयितला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास पोलिस स्थानकावर हजर रहावे असे सांगितले आहे.

Margao News
Mumbai-Goa Vande Bharat Express: गोमंतकीयांसाठी मुंबई अवघ्या साडेसात तासांवर

दरम्यान, या प्रकरणातील अन्य दोन संशयित मोहम्‍मद इस्माईल ललनवार आणि इलियास अब्दुल धलायत यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी मडगाव येथील एका नोटरीसह एकूण पाच जणांवर फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Margao News
Panaji : शालेय, पावसाळी साहित्य खरेदीची बाजारात लगबग

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की मोहम्‍मद सालेह मुसा या मडगाव येथील कपड्याच्या व्यापाऱ्याचे दवर्ली येथील दोन प्लॉट सलीम आणि राजदीप यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीच्या आधारे ललनवार आणि धलायत यांना विकले. यासाठी एका मृत नोटरीच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com