कुटबण खाडीत एकाचा बुडून मृत्यू

त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता त्याच्या पोटाकडील अंतर्गत भागात जखमा आढळून आल्या.
कुटबण खाडीत एकाचा बुडून मृत्यू
Margao कुटबण खाडीत एकाचा बुडून मृत्यूDainik Gomanatk

मडगाव Margao : कुटबण वेळ्ळी येथील रिकार्डो कार्दोज (50) याला आज बुडून मृत्यू आला. त्याच्या घरा जवळच असलेल्या खाडीत त्याचा मृतदेह सापडला. सकाळी कालवे पकडण्यासाठी तो खाडीवर गेला असताना तो पाय घसरून पाण्यात पडला असावा अशी प्राथमिक शक्यता कुंकळ्ळी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Margao कुटबण खाडीत एकाचा बुडून मृत्यू
संजना ठरली राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 'सुवर्ण पदकाची' मानकरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथे लोक कालवे पकडण्यासाठी जात असतात. सकाळी रिकार्डो एकटाच खाडीवर गेला होता.सकाळच्या वेळी खाडीत भरतीचे पाणी आले असताना तो खाडीत पडला असावा. दुपारी खाडीवर काही लोक गेले असताना त्यांना तो तिथे पडलेला सापडला.

त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता त्याच्या पोटाकडील अंतर्गत भागात जखमा आढळून आल्या. कदाचित पाय घसरून पडतेवेळी या जखमा झाल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक गुरुदास कदम हे या प्रकरणी तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com