मडगावात प्लास्टिक बंदीची ऐशीतैशी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गोव्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे.मात्र,सर्रास दुकानदार प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देतात विविध प्रकारच्या वस्तू पॅकेजिंग साठी प्लास्टिक वेस्टन वापरले जाते.प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही गंभीर स्वरूपाची समस्या आज तयार झाली आहे यावर उपाय शोधला पाहिजे तरच पर्यावरण रक्षणाचे काम होईल

नावेली:  प्लास्टिकची सर्वात मोठी समस्या म्हणजे विल्हेवाट लावणे कारण प्लास्टिक कुजत नाही त्यामुळे यावर उपाय म्हणजे प्लास्टिक कचरा न होऊ देणे व व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावर बंदी घालणे व त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी तरच प्लास्टिकचा वापर होणार नाही मात्र,सध्या मडगाव पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुका प्लास्टिक कचरा गोळा होत असल्याने प्लास्टिक बंदीची ऐशीतैशी झाली आहे.

गोव्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे.मात्र,सर्रास दुकानदार प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देतात विविध प्रकारच्या वस्तू पॅकेजिंग साठी प्लास्टिक वेस्टन वापरले जाते.प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही गंभीर स्वरूपाची समस्या आज तयार झाली आहे यावर उपाय शोधला पाहिजे तरच पर्यावरण रक्षणाचे काम होईल .प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणाला घातक ठरणारा सर्वात मोठा घटक ठरला आहे.विज्ञानाच्या प्रगती बरोबर पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी ही  प्रत्येक नागरिकाची आहे.पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास त्याची भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार आहे असे मडगावातील उद्योजक व पर्यावरणप्रेमी विवेक नाईक यांनी सांगितले.

प्लास्टिक समस्या फार मोठी आहे आणि त्याला याला सर्वस्वी नागरिकच जबाबदार आहेत.केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही मडगावात कोविड १९ टाळेबंदीच्या काळात हाॅटेल बंद असल्याने टेक अवे सुरू करण्यात आले होते आजही सुरू आहे ही पार्सल प्लास्टिक पिशव्या मधून दिली जात आहेत.दुध,तसेच अनेक दुकानदार सामान पॅकेजिंग साठी प्लास्टिकचा वापर करतात.पालिका इमारतीच्या पाठीमागे पाव विकणारे पदेर देखील पाव प्लास्टिक पिशवीत घालून देत आहेत.परंतू हे प्लास्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.मडगावात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा गोळा होत असल्याने पालिकेने सोनसड्यावर प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करावा जणे करून पालिकेला महसुल मिळू 
शकेल.

मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी आपण बाजारात खरेदी करण्यासाठी जाताना कापडी पिशवी घेऊन जातो परंतु दुकानात सामान खरेदी केल्यानंतर तो दुकानदार प्लास्टिक पिशवी देतो. दुकानदार न मागताच प्लास्टिक पिशवी देत असतो हे चुकीचे आहे असे कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.

मडगाव पालिका क्षेत्रात दर दिवशी सुमारे १३ ते १४ ट्रक सुका प्लास्टिक कचरा गोळा केला जातो व सोनसड्यावर नेऊन टाकला जातो आणि बेलींग करून कर्नाटक राज्यात सिमेंट तयार करणाऱ्या फॅक्टरीत पाठविण्यात येतो आॅक्टोबर महिन्यात सुमारे ४० ट्रक कचरा पाठविण्यात आला अशी माहिती पालिका सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मडगाव न्यु मार्केट टेडर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी गोव्यात प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली आहे गेल्या वर्षी जानेवारीत न्यु मार्केट मधील व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक जप्त करून प्रत्येकी ५००  रुपये प्रमाणे दंड आकारला होता.त्यामूळे व्यापाऱ्यांनी सहा महिने प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद ठेवले होते.प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले होते प्लास्टिक बंदी कारवाई करण्यासाठी येणारे अधिकारी स्वतः प्लास्टिक पिशव्या घेऊन बाजारात जातात.दुकानदारांजवळ मागणी करतात व सामान्य व्यापाऱ्यावर कारवाई करतात असे शिरोडकर यांनी सांगितले.

पानाच्या पत्रावळी ऐवजी थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळी प्लास्टिक ग्लास वापरण्यावर भर दिला जात आहे व हा कचरा मोकळ्या जागेत फेकला जातो त्यामुळे कचरा नाल्यात गटारात साचतो. प्लास्टिक कचर्‍याचे विघटन होत नाही.हवे मार्फत हलका कचरा सर्वत्र पसरतो.पाळीव जनावरे खाऊन मृत्युमुखी पडतात.प्लास्टिक कचरा जाळल्याने निर्माण होणारा वायु सजिवांच्या जीवाला घातक ठरतो.

पालिका मुख्याधिकारी आग्नेल फर्नाडीस यांनी मडगावात प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी संबंधी लवकरच कारवाई करण्यात येईल असे संकेत त्यांनी दिले.

संबंधित बातम्या