Goa News: सोनसोडोवरील कचऱ्याचा ढीग फेब्रुवारीपर्यंत उचलण्याचे उद्दिष्ट

Goa News: मडगाव पालिकेचा निर्णय : दैनंदिन कचऱ्याचा पेच कायम
Margao Municipal Council | Goa News
Margao Municipal Council | Goa News Dainik Gomantak

Goa News: सोनसोडो कचरा प्रकल्पाच्या बाहेर जुन्या कचऱ्याचा जो ढीग आहे, तो येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हटविला जाईल असे कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितले. मात्र, मडगाव शहरात रोजच्या रोज जो कचरा तयार होतो, त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी मडगाव पालिकेचीच असेल हेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सध्या सोनसोड्यावरील कचरा प्रकल्पा त साठवून ठेवलेल्या ओल्या कचऱ्याचा ढीग वाढल्याने आमदार दिगंबर कामत यांनी आज मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यासह या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात कचऱ्याची चाळण करणारी क्रेन बंद पडल्याने यापुढे पोकलीनचा वापर करावा अशी सूचना त्यांनी केली.

Margao Municipal Council | Goa News
Goa Road News: आधी रस्ते खड्डेमुक्त करा, मगच तिसऱ्या विमानतळाचे स्वप्न पाहा

दर पंधरा दिवसांनी घेणार आढावा

सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी यापुढे झालेल्या कामाचा आढावा दर पंधरा दिवसांनी घेण्यात येणार असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. मार्टिन्स हे स्वतः दर 15 दिवसांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतील असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पातील जुना कचरा पूर्णतः साफ केल्यावर रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायो डायजेस्टर बसविण्यात येणार असल्याचे लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com