कोल्हापूर येथील अत्याचार प्रकरणी मडगावचा एपीआय विराग पवार निलंबित

कोल्हापूर येथे एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक विराज पवार यांच्या विरोधात मडगाव पोलिसांत गुन्हा नोंद
Goa police
Goa policeDainik Gomantak 

गोवा: कोल्हापूर येथे एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक विराज पवार यांच्या विरोधात मडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दरम्यान हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांना पाठवणार असुन संशयित पोलिस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलेले आहे.

(Margaon API Virag Pawar suspended)

Goa police
राज्यात तुरळक पावसाची शक्यता

सांगोल्डा धमकी प्रकरणामुळे गोवा पोलिसांची इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. त्यातच अत्याचाराचा आरोप असलेला मडगाव पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक विराग पवार याला निलंबित करण्याचा आदेश दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी काल बुधवारी जारी केला. मडगाव येथील एका महिलेने पवार याच्या विरोधात तक्रार दिली असून या उपनिरीक्षकाने आपल्यावर कोल्हापुरात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.

पुरावे म्हणून तिने काही आक्षेपार्ह व्हिडिओ जोडल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मडगाव पोलिसांनी ही तक्रार नोंद करून घेतली असून पुढे कारवाई करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडे पाठविली आहे. यासंदर्भात एवढेच त्यांनी सांगितले.

अधिक माहिती मिळवण्यासाठी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक बनिया यांच्याकडे संपर्क साधला असता त्या उपनिरीक्षकाला निलंबित केल्याच्या वृताला त्यांनी दुजोरा दिला. या कारवाईचे कारण विचारले असता, त्या उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद झालेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com