
Margao Municipality : मडगाव पालिका परिसरात कोमुनिदाद इमारतीलगतच्या जागेवर फेरीवाल्यांच्या अवैध व्यवसायाविरूद्ध भाजपच्या सोशल मीडिया सेलचे सहनिमंत्रक नवीन पै रायकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मडगाव पोलिस स्थानकात ही तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
या बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या व्यवसायामुळे नागरिकांना, जे अधिकृत व्यवसाय करतात, त्या दुकानदारांना त्रास होऊ लागला आहे. नगरपालिका परिसरात सुशोभीकरण केले असून दुचाकी ठेवण्यासाठीही जागा उपलब्ध करण्यात आली आहे. हे फेरीवाले कुणाच्याही परवानगीशिवाय हा बेकायदेशीर धंदा चालवित आहेत.
हे फेरीवाले पदपथावर बसून आपल्या विक्रीच्या वस्तू मांडत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होऊ लागला आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गिऱ्हाईकांवरून त्यांच्यामध्ये भांडणे सुद्धा होत असतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. हे फेरीवाले पालिकेला किंवा संबंधितांकडे कोणतेही शुल्क भरत नाहीत. यांच्यामुळे न्यू मार्केटमधील दुकानदारांना तोटा सोसावा लागत आहे. नागरिकांना आपल्या दुचाकीही ठेवता येत नाहीत.
या अवैध फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करावी,अशी विनंती या तक्रारीत रायकर यांनी केली आहे. या फेरीवाल्यांबद्दल यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या आहेत. नगरपालिकेत व पोलिस स्थानकातही हा विषय चर्चिला गेला आहे. पण कारवाई केल्यावर दोन दिवस थांबतात व नंतर पुन्हा धंदा सुरु करतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.