मडगाव घाऊक मासळी मार्केट संघटनेची याचिका न्यायालयाने फेटाळली

दैनिक गोमन्तक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

मडगाव घाऊक मासळी मार्केट संघटनेने मार्केटमध्ये मासळीवाहू वाहने उभी  करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ केल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सासष्टी: मडगाव घाऊक मासळी मार्केट संघटनेने मार्केटमध्ये मासळीवाहू वाहने उभी  करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ केल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच मार्केटमधील 5000 चौ मीटर जागा संघटनेला व्यवसायासाठी द्यावी अशी मागणी केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असल्याची माहिती एसजीपीएच्या सदस्य सचिव वर्तिका डागूर यानी मडगाव घाऊक मासळी मार्केट संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम याना केलेल्या पत्रकात दिली आहे. 

एसजीपीडीएच्या रिकोर्ड्सनुसार एसजीपीडीएने तब्बल १७ वर्षानंतर सदर शुल्कात वाढ केलेली असून एसजीपीडिएने यासाठी घेतलेल्या बैठकीत आवश्यक घटकांवर चर्चा करूनच ही दरवाढ ठरविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने दरवाढ मागे घेण्यासाठी केलेली मागणी फेटाळण्यात येत आहे, असे पत्रकात स्पष्ट केले आहे.

घाऊक मासळी मार्केटमध्ये येणाऱ्या मासळी वाहनांना मार्केटच्या बाहेर वाहने पार्क करण्यासाठी जागा देणे शक्य नसून मार्केटमध्ये मासळी खाली करून वाहने मार्केटबाहेर उभी केल्यास कोंडीस कारणीभूत ठरू नये असेही संघटनेला सांगण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जी संघटना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहे त्यांनी दरवाढ करण्याच्या तक्रारी करू नयेत असेही सांगण्यात आले आहे. संघटनेने मार्केट जागेतील 5000 चौरस मीटर जागा देण्यासाठी केलेली मागणीही संबंधित अधिकाऱ्यांना अमान्य असून असे करणे अन्यायकारक ठरेल असे पत्रकात स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या