डिचोलीत झेंडूचा दर १८० रुपये!

Marigold in Dicholi costs Rs 180!
Marigold in Dicholi costs Rs 180!

डिचोली: कर्नाटक राज्यातील फुलांची डिचोली बाजारात आवक होत असली, तरी गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील फूल उत्पादकांनी बाजारात आक्रमण केले आहे. हे उत्पादक दसरा, दसरा या उत्सव काळात बाजारात येऊन स्वतःच फुलांची विक्री करतात.

यंदाही कर्नाटकातील फूल विक्रेत्यांनी स्थानिक फूल विक्रेत्यांना घाऊक दराने फुले न देता, स्वतःच फुले विकण्यास सुरुवात केली आहे. बाजारात विविध ठिकाणी मिळून ३० हून अधिकजण  कर्नाटकातील फूल विक्रेते फुले विकताना आढळून येत आहेत. त्यांचा फूल विक्रीचा धंदाही तेजीत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत १८० रु. प्रति किलो याप्रमाणे झेंडूंची फुले विकण्यात येत होती. सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. उद्या सकाळी त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. कर्नाटकातील फूल विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे  बाजारातील पारंपरिक फूल विक्रेत्यांना काही प्रमाणात फटका बसला आहे. 

रविवारी साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर डिचोलीत कर्नाटक राज्यातून झेंडूंच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, बाजारात कर्नाटकातील फुल विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. स्थानिक झेंडूची फुले विक्रीस उपलब्ध असली, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. बाजारातील गणपती पूजन मंडपात कर्नाटकातील फुलांचा खास बाजार भरला आहे. बाजारात अन्यत्रही कर्नाटकातील फुले विक्रीस उपलब्ध आहेत. यंदा पडलेल्या असंतुलित पावसामुळे स्थानिक गावठी झेंडूच्या फुलांवर परिणाम झाल्याने या फुलांचा बराच तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कर्नाटकातील फुलांना तेजी आली आहे.

कालपासून डिचोलीत कर्नाटकातील फुलांची आवक सुरू झाली आहे. आज शनिवारी सकाळी तर ही आवक वाढली होती. अलीकडेच पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकात फुलांवर परिणाम झाल्याने यंदा आवक घटणार असा अंदाज होता. तरीदेखील बाजारात यंदाही कर्नाटकातील फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. शहरात विविध ठिकाणी झेंडू फुलांच्या माळाही विक्रीस उपलब्ध आहेत. 

स्थानिक फुलांना मागणी!
कृषी खात्याच्या "आत्मा" योजनेंतर्गत डिचोलीतील विविध भागात मिळून यंदा १६ शेतकऱ्यांनी झेंडू फुलांचे मळे फुलवले आहेत. जवळपास १३ हजार हेक्‍टर जमीन झेंडू फुलांच्या लागवडीखाली आली आहे. झेंडू फुलांचे मळेही समाधानकारक बहरले आहेत. या फुलांना मळ्यांच्या ठिकाणीच भाव आल्याने ही फुले बाजारात विक्रीस आलेली नाहीत. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे स्थानिक झेंडू फुले बाजारात दिसून येत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com