झेंडूच्या फुलांनी रस्ते आणि बाजार सजला...

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

झेंडूच्या फुलांचा खास मान दसऱ्याच्या दिवशी असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही फुले आणि या फुलांच्या माळा खरेदी करण्यासाठी लोकांची आज घाई सुरू होती. यावर्षी ग्रामीण भागात एक किलो झेंडूचा दर १२० रुपये किलो इतका, तर शहरी भागात झेंडूचा दर २०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने ओवलेल्या माळा ७० ते ८० रुपये प्रती माळ असल्याची माहिती या विक्रेत्यांकडून मिळाली. 

पणजी: झेंडूच्या फुलांचा खास मान दसऱ्याच्या दिवशी असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही फुले आणि या फुलांच्या माळा खरेदी करण्यासाठी लोकांची आज घाई सुरू होती. यावर्षी ग्रामीण भागात एक किलो झेंडूचा दर १२० रुपये किलो इतका, तर शहरी भागात झेंडूचा दर २०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने ओवलेल्या माळा ७० ते ८० रुपये प्रती माळ असल्याची माहिती या विक्रेत्यांकडून मिळाली. 

मात्र, यावर्षी एकमेकांच्या शेजाऱ्यांनाही  झेंडूची फुले पैसे घेऊन विकली जात असतानाचे चित्र यावर्षी निरीक्षणास आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच आर्थिक फटका बसल्याने ग्रामीण भागातील लोक फुले आणि फुलांच्या माळा विकण्यासाठी दरवर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात शहराकडे वळल्याचे दिसून आले.

झेंडूच्या खरेदीसाठी लोकांनी बाजारात गर्दी केली होती. पणजी बाजरपेठेत आणि या परिसरात ठिकठिकाणी लोक झेंडूच्या माळा विकताना आज सकाळी १० वाजल्यापासून दिसून आले. १८ जून रस्त्यासह सांतीनेझ रस्त्यावरही अनेक महिला तसेच पुरुष झेंडूच्या माळा हातात घेऊन उभे राहिले होते. पणजी बाजारपेठेत झेंडूची फुलांची विक्री दोन दिवसांपूर्वीच झाली होती. तेव्हा म्हणावा तसा खप झाला नाही. आज  फुलांचा खप चांगल्या पद्धतीने झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दिवसा ७० ते ८० रु माळ इतक्या दराने विकलेल्या माळा सायंकाळी ५० रु. प्रतिमाळ या दरात विकण्यात 
आल्या.

संबंधित बातम्या