Mormugao: 'तो' कम्युनिटी हॉल प्रकल्प म्हणजे 'पांढऱ्या हत्ती'चे उत्तम उदाहरण

दीड वर्षे उलटले तरी मार्केटातील दुकानांचे वाटप नाहीच
Mormugao News
Mormugao NewsDainik Gomantak

वास्को: मुरगाव, सडा येथील मार्केट कॉम्प्लेक्स कम कम्युनिटी हॉल प्रकल्प हा 'पांढऱ्या हत्ती'चे उत्तम उदाहरण ठरले आहे.गोवा राज्य स्थापना दिनी अधिकृतरीत्या उद्घाटन झालेल्या या प्रकल्पाचा आजपर्यंत उपयोग झालेला नाही. या संकुलातील अपूर्ण विद्युत कामामुळे या पायाभूत सुविधांचे काम होत नाही.

मार्केट कॉम्प्लेक्स कम कम्युनिटी हॉल प्रकल्प 2016 च्या अखेरीस अस्तित्वात आला आणि 2018 पर्यंत पूर्ण होण्यापुर्वी ही पायाभूत सुविधा कर्मचारी व इतर लोकांना वापरता यावी, यासाठी इमारत बांधून उभी राहिली असली तरी यातील विद्युतीकरणाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने, ही संरचना कार्यान्वित होण्यासाठी रखडली आहे.

(Market Complex Community Hall Project at Mormugao Sada is incomplete since 2016)

Mormugao News
Water Supply: बार्देश, डिचोली तालुक्यात तीन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

महत्त्वाची बाब म्हणजे गतवर्षी गोवा राज्य स्थापना दिनी मुरगाव नगरपरिषद सदस्य व भाजप समर्थकांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. जिसुडाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या प्रकल्पासाठी 2,30,85,304 रुपये इतका खर्च आला आहे.

मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दामोदर कासकर यांना या नवीन मार्केट कॉम्प्लेक्स इमारतीत जुनी पालिका प्रशासनाचे कर्मचारी स्थलांतरित करण्यात व कामकाजात दिरंगाईबाबत विचारणा केली असता, त्यांनी या मार्केट कॉम्प्लेक्सच्या इमारतीचे उद्घाटन होऊनही अंतर्गत विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याचे मान्य केले.

Mormugao News
Tourist from UK : युकेच्या पर्यटकांना भारतीय व्हिसा मिळण्यास अडचणी, गोव्यातील बुकिंग्स फटाफट रद्द

ही नवीन बांधलेली इमारत प्रलंबित आहे. आणि ते पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 पर्यंत या इमारतीतील पालिकेच्या कामकाजाचे स्थलांतर होईल. या चार मजली सडा मार्केट कॉम्प्लेक्स कम कम्युनिटी हॉल प्रकल्पात मासे आणि भाजी विक्रेत्यांसाठी दुकाने, व्यायामशाळा, पार्किंग सुविधा, कम्युनिटी हॉल इ. आहे.

आजूबाजूची इमारत कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड बनल्याचे दिसून आले. इमारतीच्या खाली झुडपे आणि वन्य वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे ते उंदीर, साप आणि भटक्या जनावरांसाठी हे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. पायाभूत सुविधा उभारून जवळपास दोन वर्षे झाली आहेत, मात्र या प्रकल्पाकडे दुर्लक्षित राहिल्याने मुरगाव मतदारसंघात हा पांढरा हत्ती बनला आहे.

हा प्रकल्प उभारण्यासाठी मुरगावचे माजी आमदार व माजी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी पुढाकार व परिश्रम घेतले होते. मार्केट प्रकल्पाच्या पहिल्या मजल्यावर फळभाजी मासळी मार्केट, बर्फ साठवणूक रूम, दुसऱ्या मजल्यावर 23 दुकाने, तिसऱ्या मजल्यावर सुपरमार्केट, चौथ्या सामाजिक सभागृह, तळमजल्यावर वाहन पार्किंग व्यवस्था, लिफ्ट अशा मजल्यावर सर्व सुविधा आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व व्यायाम शाळाही या प्रकल्पात भविष्यात आणण्याचा विचार आहे.

हे मार्केट लोकार्पण करण्यात आल्यावर ते लवकरच सुरू करण्यात येईल याची खात्री असल्याने संबंधित आनंदित होते, परंतु, आता दीड वर्षे उलटून गेली तरी सदर मार्केटातील दुकानांचे वाटप होत नाही. लोकांना मुरगाव पालिकेत बोलाविले जाते. परंतु, संबंधित अधिकारी नाही, काम खूप आहे, असे सांगून त्यांना परत पाठविले जाते. त्यामुळे संबंधित लोकही वैतागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com