गोव्यातील बाजारपेठा ‘नाताळ’साठी सजल्या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राज्यात नाताळाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. यावर्षी २५ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नाताळासाठी बाजारांमध्ये सजावटीचे सामान आले आहे.

पणजी  :  दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राज्यात नाताळाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. यावर्षी २५ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नाताळासाठी बाजारांमध्ये सजावटीचे सामान आले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी समानसुद्धा कमी प्रमाणात आले आहे आणि हे सामान खरेदी करण्यासाठी जशी दरवर्षी गर्दी होई, तशी गर्दी खूप कमी प्रमाणात आहे. ख्रिस्ती बांधव आपल्या घरामध्ये नाताळाची तयारी करीत आहेत. नाताळाबाबतची लगबग घराघरांमध्ये दिसून येत आहे.

 

.
अनेक दुकानांमध्ये मागील वर्षीचे जुने सामान ठेवले असल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री, सांताचे मुखवटे, स्नोबॉल आणि इतर सजावटीचे सामान पहायला मिळत आहे. यासंदर्भात पणजी बाजारपेठेतील काही दुकानदारांशी बातचीत केली असता वस्तू आणि सजावटीच्या सामानाच्या विक्रीचा बाबतीत त्यांच्यात नाराजीचा सूर असलेला ऐकायला मिळाला. दरवर्षी नाताळ एका महिन्यावर असला कि ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येत असत. यंदा नवीन स्वरूपात आलेले सजावटीचे सामान बाजारात उपलब्ध असून अनेक जण खरेदी करीत आहेत. विविध प्रकारचे  सजावट साहित्य उपलब्ध झाले आहे. बाजारात खूप गर्दी दिसत नसली तरीसुद्धा खरेदीला सुरुवात झाली आहे.

 

बाजारात सजावट साहित्या बरोबरच इतर साहित्याचेही दरवर्षीपेक्षा दर थोडे कमी आहेत. तरीसुद्धा खरेदीला गर्दी दिसत नाही. दिवाळीच्या वेळीसुद्धा खूपच कमी प्रमाणात लोकांनी सामानाची खरेदी केली, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीत व्यवसाय झालेला नाही. ख्रिसमसमध्ये होईल असे वाटत होते, मात्र व्यवसायाची सुरुवात खूप समाधानकारक नाही. काही दिवसांनी नाताळ जवळ आल्यावर जर लोक खरेदीसाठी आले, तर आमच्यासाठीसुद्धा ही बाब अतिशय चांगली असल्याचे मात्र बाजारपेठेतील रक्त दुकानदाराने व्यक्त केले. अनेक दुकानांच्या द्वारावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रंगरंगोटी करण्यासाठीचे काम सुरू आहे. काहींनी तर नाताळाच्या खरेदीसाठी सूट असल्याचे फलकसुद्धा दुकानावर लावले आहेत. शिवाय लोक घराची सजावट करण्यासाठी उत्साही असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याशिवाय राज्यात असणारे ठिकठिकाणचे चर्च यानिमित्ताने रंगवायला सुरुवात झाली आहे. चर्चमधील साहित्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे.

 

 

अधिक वाचा :

गोव्यातील महिलांची जागृकता; गोव्यात गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी

गोव्यात कोरोना बळींची संख्या ६९७ वर

साहाय्यभूत ठरणारी आर्थिक साहाय्य योजना सरकारने स्थगित केल्याने गोव्यातील लेखक-प्रकाशक नाराज

संबंधित बातम्या