मोपात आज ‘विवाहित मुलींचा उत्सव’; गिरोबा देवाचा वार्षिकोत्सव

अवघी विठाई माझी’चे सादरीकरण
Anniversary of Giroba Dev
Anniversary of Giroba DevDainik Gomantak

मोपा गावातील श्री देव गिरोबा देवाचा वार्षिकोत्सवासोबत गुढीपाडवा विविध कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव गावातील विवाहित मुलींचा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे.

आजच्या दिवशी मोपा गावातून लग्न करुन दिलेली मुलगी आपल्या कुटुंबा सह मोपात आपल्या माहेरी येते. सासुरवासीण मुलीला गावची ओढ लावणारा हा उत्सव आपल्या माहेरबद्दल आदर व प्रेम निर्माण करणारा आहे.

गिरोबा देवाच्या विधिवत पूजा विधी झाल्यानंतर नैवेद्य वगैरे करून सर्व मंडळी आपापल्या घरी जातात व दुपारी पुन्हा या ठिकाणी सर्व मंडळी गावचे ग्रामस्थ जमून आपापल्या बहिणींसोबत, मुलींसोबत चव्हाट्यावर जमतात. नंतर नारळ ठेवून सांगणे दिल्यावर अवसार उभे करून मुलींना अवसारी कौल दिला जातो.

Anniversary of Giroba Dev
डोक्याला चालना द्या, गोवा पोलिसांना अ‍ॅप बनवायला मदत करा; जिंका कॅश प्राईज, जाणून घ्या सविस्तर

कौल झाल्यानंतर पावणी होते. नंतर सर्व मुली नारळ कोंबड्याचा मान देवाला देतात व व सामूहिक सांगणे केले जाते. नंतर गावच्या लोकांना देवदर्शन रात्री गावातील गावचे तरुण नाटक करतात. या वर्षी फार उत्साहात हा कार्यक्रम केला जाणार आहे.

यानिमित्त बुधवारी 22 रोजी रात्री 10 वाजता तरुण हौशी नाट्य मंडळातर्फे नरेंद्र नाईक लिखित संगीत दोन अंकी नाटक ‘अवघी विठाई माझी’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. नाटकाला संगीत दिगंबर गाड यांनी दिले आहे तर त्यांना तबला साथ अमर मोपकर हे करतील मंजिरी साथ आत्माराम रेडकर हे करतील.

पार्श्‍वसंगीत सत्यवान नाईक, ध्वनी संकलन सुभाष शिरोडकर, नेपथ्य व रंगभूषा वेशभूषा व रंगमंच व्यवस्था सोपटे नाट्य भांडार पार्से यांची असेल. नाटकाचे दिग्दर्शन व प्रकाश योजना पांडुरंग पांगम यांची आहे. या नाटकात संदेश शेट्टी, प्रसाद परब, गिरीश परब, संदेश नाईक गावकर, निशांत परब, प्रथम परब, अर्पिता गांवस, श्रीरंग सावंत उमेश नाईक गावकर, संकेत परब, महादेव परब, शांताराम पालव, प्रांजल परब, आयुष नाईक, रुपेश सावंत, स्वानंद नाईक गावकर यांच्या भूमिका आहेत. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी माउली पंचायतन देवस्थान समितीने केले आहे.

Anniversary of Giroba Dev
Illegal cutting of Khair Trees : खैर वृक्ष तस्करीप्रकरणी 11 अटकेत

आंब्याच्या होळीचा साकारतात ‘गिरोबा’

गिरोबा देवाच्या वार्षिकोत्सवाच्या दिवशी सकाळी ग्रामस्थ व गावची महाजन मंडळी गावच्या चव्हाट्यावर जमून होळी पौर्णिमेला घातलेल्या आंब्याच्या होळीचा गिरोबा तयार करण्यासाठी तोरसे गावातील पारंपरिक चारी कुटुंब तो आंबा कापतात व त्याची सुबक गिरोबाची मूर्ती तयार केली जाते. या मूर्तीला हळद लावून सजवली जाते. नंतर गावचे पुरोहित दिगंबर फाटक यांच्या पौरोहित्याखाली गावचे महाजन त्या मूर्तीची पूजा करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com