26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना उद्या पणजीत आदरांजली

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

खिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेच्यावतीने येत्या २६ नोव्हेंबर रोजी २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पणजी : अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेच्यावतीने येत्या २६ नोव्हेंबर रोजी २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 जोशी म्हणाले की, आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शहिदांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून व हुतात्मा स्मारकासमोर मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर ‘जरा याद करो कुर्बानी’ हा कार्यक्रम होईल. मेजर वेणुगोपाल नायर हे मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याविषयी माहिती सांगतील. या कार्यक्रमात महापालिका, गुज, सम्राट क्लब (पणजी), रोटरी क्लब (पर्वरी), रोटरी क्लब (मिरामार), लायन्स क्लब (पणजी), युथ होस्टेल (मिरामार), जय हिंद फाऊंडेशन आदी संघटना सहभागी होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

गोव्यातील किनारे सुरक्षीत आहेत का याविषयी जोशी म्हणाले की, २००८ नंतर गोव्यातील किनाऱ्यावर सुरक्षिततेचे उपाय झालेले नाहीत. गोव्यातील किनारी भागात अनेक ठिकाणे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे राज्य सरकारने किनारी भागातील सुरक्षिततेवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

संबंधित बातम्या