माशेल पंचक्रोशीत चतुर्थीची लगबग

संजय घुग्रेटकर
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

माशेल पंचक्रोशीत गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून सजावट साहित्याचीही विक्री सुरू आहे. सगळीकडे सामाजिक अंतर ठेवून खरेदी केली जाते. काही ठिकाणी मखर तयार करण्याचे कामही सुरू आहे. इतर साहित्याबरोबरच गणेश पूजनप्रसंगी लागणारी वाद्येही विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही युवक बाजारात फिरून ही वाद्ये विकत आहेत.

खांडोळा

तासे, छोटे ढोल यांची २०० ते १‘५० रुपयांना उपलब्ध आहे. टाळेबंदीनंतर गोव्यात राहिलेले काही विक्रेते आपल्या राज्यातून म्हणजे बिहार, उत्तरप्रदेशातून ही वाद्ये मागवून विकत आहेत. बाजारात चतुर्थीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. इतर आस्थापनाबरोबरच बागायदारमध्येही मोठी गर्दी आहे. बागायदारमध्ये दुपारी जेवणाच्या सुटीतही साहित्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ओझ्याचे साहित्यही काही ठिकाणी तयार करण्‍यात येत असून काहींनी त्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. तसेच घरगुती फराळही तिवरे, माशेल, तारीवाड्यावर काही ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांच्याकडेही आगाऊ नोंदणी करण्यात येत आहे. अनेकांना यंदा करोनामुळे बाजारात फिरणे, गर्दी करणे टाळले असून भ्रमणध्वनीद्वारे आपली मागणी नोंदवली आहे, अशी माहिती फराळ तयार करण्यांकडून देण्यात आली.
बाजारात अनेक ठिकाणी आकर्षक मूर्ती उपलब्ध आहे. यांपैकी बऱ्याच मूर्तीची विक्रीही झालेली आहे. यंदा बाहेर गावी न जाणाऱ्यांनी मूर्तीची मागणी नोंदवली आहे.

संबंधित बातम्या