महामार्गाला जोडणाऱ्या 'मिसींग लिंक' वर मोठ्या प्रमाणात भूस्खलन!

आयडीसी वेर्णा ते लोटली महामार्गाला जोडणाऱ्या 'मिसींग लिंक' वर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन माती व मोठे दगड या महामार्गावर आले.
Massive landslides on the 'Missing Link' connecting the highway
Massive landslides on the 'Missing Link' connecting the highwayDainik Gomantak

वास्को: आयडीसी वेर्णा ते लोटली महामार्गाला जोडणाऱ्या 'मिसींग लिंक' वर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन माती व मोठे दगड या महामार्गावर आले. त्यामुळे महामार्ग वाहतुक रहदारीसाठी बंद झाला. या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.याठीकाणी अजून भूस्खलन होण्याच्या मार्गावर असून तातडीची उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

(Massive landslides on the 'Missing Link' connecting the highway)

Massive landslides on the 'Missing Link' connecting the highway
गोव्यात नियोजनाचा फोलपणा ; रस्ते जलमय

आज शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता वेर्णा ते लोटली महामार्गाला जोडणाऱ्या 'मिसिंग लींक' वर मोठ्या भूस्खलनाची नोंद झाली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही तरी हा महामार्ग आता वाहन चालकांना धोक्याचा बनला आहे. कारण टेकडीवरून मोठमोठे दगड मुख्य रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर आहे. काल पासून पडत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी या मार्गावर टेकडीवरून मोठे दगड माती सहित रस्त्यावर आले. दैव बलवत्तर म्हणून यावेळी वाहतूक रहदारी जास्त नव्हती. भूस्खलन होऊ नये तसेच दगड माती रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी या टेकडीवर जाळे उभारले आहे. मात्र कालपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज शुक्रवारी पहाटे या परिसराला पावसाने झोडपून काढले सकाळी साडेसात वाजता भूस्खलनाची नोंद झाली.

Massive landslides on the 'Missing Link' connecting the highway
ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे अग्निपथ योजनेविरोधात आझाद मैदानावर निदर्शने

दरम्यान भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हणून ओळखणाऱ्या जाणाऱ्या या ठिकाणी अधिक भूस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे 'मिसिंग लेन' वरून जाणाऱ्या वाहनासाठी हे क्षेत्र धोक्याचे बनले आहेत. या परिसरात पुढील भूस्खलन टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावी जेणेकरून मानवी जीवित व मालमत्तेचे हानी वाचवू शकेल अशी मागणी होत आहे.

दरम्यान सकाळी साडे सात वाजता वेणाॆ आयडीसी अग्नीशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रस्त्यावर पडलेल्या माती व दगड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.सकाळी साडेदहा पर्यंत रस्ता मोकळा करण्यात आल्याची माहीती वेणाॆ अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com