मडगावात माटोळीची साहित्य घरपोच

UTTAM GONKAR
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

फातोर्डा

सर्वत्र करोना महामारी पसरल्याने पुष्कळ लोकांनी आपली चतुर्थी पुढे ढकलली आहे. काहींनी साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. लोक बाजारात जाण्याचे टाळतात. जे ग्रामीण भागातील लोक शहरी बाजारात येऊन माटोळी साहित्य विकत असत ते गेल्या तीन-चार महिन्यांपासून येत नाहीत.

फातोर्डा

सर्वत्र करोना महामारी पसरल्याने पुष्कळ लोकांनी आपली चतुर्थी पुढे ढकलली आहे. काहींनी साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. लोक बाजारात जाण्याचे टाळतात. जे ग्रामीण भागातील लोक शहरी बाजारात येऊन माटोळी साहित्य विकत असत ते गेल्या तीन-चार महिन्यांपासून येत नाहीत. कोविड१९च्या पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊनपासून अत्यावश्यक वस्तू घरपोच करण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे काही जणांनी माटोळी सामग्री घरपोच करण्याची व्यवस्था सुरु केली आहे.
साहित्य ऑनलाइन डिलिवरी वेन्चरच्या रुची देशपांडे यानी सां जुझे आरियल येथून ही सेवा उपलब्ध केली आहे. सुरुवातीला आपल्या जास्तीत जास्त ५० ऑर्डर्स घेण्याची तयारी होती. पण आता मागणी वाढत आहे असे देशपांडे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपण २५०० रुपयांमध्ये माटोळीसाठी लागतात त्या ३० वस्तू घरपोच करणार आहे. यामध्ये कांगला, कात्रे, करमलां, खुळखुळे, सुपारी, शिपटी, भोबरो, दोडगी, आमाड्याची चुड, नऊ प्रकारची फळे, सात-आठ भाज्या, मका, खावची पाने, भाताचे नवे या सारख्या वस्तूंचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याला केवळ मडगाव नव्हे तर फोंडा, म्हापसा, पणजी, मडकई, खांडेपार सारक्या भागातूनही मागणी येत आहे. हा अनपेक्षित प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे जी परिस्थिती उद्‌भवली आहे त्याचा सारासार विचार करून हा निर्णय घेण्यात आला. या सर्व वस्तू आम्ही काणकोण व इतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध केले असे त्या म्हणाल्या. शिवाय गौरी पूजेची वायणांही घरपोच करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
कोंब मडगाव येथील शुभम तालक यांनी सुध्दा माटोळी सामग्री घरपोच करण्याची व्यवस्था केली आहे. आपण केवळ मडगाव पुरते मर्यादित न राहता संपूर्ण गोव्यात ही व्यवस्था राबविली आहे. मात्र आपल्याला अपेक्षे इतका प्रतिसाद लाभलेला नाही, हे त्याने मान्य केले. त्याने १८०१ रुपयात सुपारी शिपटे, केळ्यांचा घड, मंयडोळी केळ्यांचा फेणा, नारळ, पंच फळे, पाच भाज्या, दोन रानवटी फळे, आंब्याचे ताळे वगैरे घरपोच करणार आहे असे त्याने सांगितले.
या व्यवस्थेमुळे जे लोक करोनाच्या धास्तीने घरीच राहणे पसंत करतात त्यांच्यासाठी ही चांगली व्यवस्था असल्याचे व त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या