मये परिसरात रात्रीचे अवैध खाण वाहतुकीचे ‘कारनामे’

खाण आणि भूविज्ञान संचालकांच्या आदेशाची पायमल्ली
मये परिसरात रात्रीचे अवैध खाण वाहतुकीचे ‘कारनामे’
mayem illegal mining transportation Dainik Gomantak

मये: खाण आणि भूविज्ञान संचालकांच्या आदेशानुसार संध्याकाळी 6 नंतर अवैध खाण वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र तरीही मये येथे अवैध खाण वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. शेवटचा ट्रक संध्याकाळी 6 वाजता लोड करावा असा खाण आणि भूविज्ञान संचालकाचा आदेश आहे. मात्र आदेशाला फाट्यावर मारत याठिकाणी खाण वाहतूक सुरु आहे.

मये ग्रामस्थांनी गावकरवाडा येथे ट्रक थांबवले आणि आजचे लोडिंग स्लिप ट्रकचे लोड 7.14 वाजता समोर आले आहे. मये परिसरातुन ही वाहतुक करण्याचा मार्ग नाही. तरीही मये याठिकाणाहुन ही वाहतुक केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा फटका बसत आहे. लोडिंग स्लिप मार्गाचा उल्लेख स्लिपवर सिरिगाव प्लांट-डिचोली जंक्शन- कानपूर जंक्शन-साखळी-नावेली-सुर्ला असा रुट आहे. मात्र संबंधित वाहतुक ही गावकरवाडा परिसरातुन होत आहे.

 mayem illegal mining transportation
सरपंच प्रणेश नाईक प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीत अटक

ई-लिलाव खनिज वाहतुकीचा प्रश्न तापल्यानंतर पैरा-मये येथील खाणीवर रात्रीच्या वेळी बेकायदा कारनामे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्यात येत असून, मध्यरात्री लोक गाढ झोपेत असताना खनिज वाहतूक करण्यात येत आहे, असा दावा मयेतील काही जागृत नागरिकांनी केला आहे. बेकायदा खनिज उत्खनन करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करणे म्हणजे सरकारचा महसूल बुडवणे होय, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.

..तर पुन्‍हा रस्‍त्‍यावर उतरावे लागेल!

ई-लिलावाच्या खनिज वाहतुकीवरून काही दिवसांपूर्वी मये गावात वातावरण तापले होते. गावातून नियमबाह्य खनिज वाहतूक होत असल्याचा आरोप करून किमान पाच ते सहावेळा नागरिकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला होता. आता रात्रीच्या वेळी खनिज उत्खनन करून त्याची रात्रीच वाहतूक करण्यात येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सरकारने वेळीच हा प्रकार रोखला नाही तर या बेकायदेशीर कृत्याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरणे भाग पडेल, असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.