Mayem : वैद्य सुविनय दामले यांचे ‘ऋतुचर्या’वर व्‍याख्‍यान

मये येथील सत्रात ग्रंथांमध्‍ये वर्णन केलेल्या गोष्टी सोप्या पद्धतीने आचरणात कशा आणाव्यात, या संदर्भात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्‍यात आले
Mayem Lecture on 'Ritucharya' by Vaidya Suvinay Damle
Mayem Lecture on 'Ritucharya' by Vaidya Suvinay DamleGomantak Digital Team

मये : निरामय आरोग्‍याची गुरुकिल्‍ली अर्थात आयुर्वेद व आचरण विषयक महिती जनसामान्‍यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी कार्यरत असणाऱ्या डिचोली येथील दीनदयाळ आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालयाच्‍या वतीने मंगळवारी मये येथील तळ्यावर अभिनव उपक्रम आयोजित केला होता. त्‍याला उदंड प्रतिसाद लाभला.

मये येथील सत्रात ग्रंथांमध्‍ये वर्णन केलेल्या गोष्टी सोप्या पद्धतीने आचरणात कशा आणाव्यात, या संदर्भात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्‍यात आले. सहभागी व्‍यक्‍तींना शीतल चंदन तिलक लावून, सुगंधी गजरे आणि पुष्पांनी स्वागत करण्‍यात आले.

Mayem Lecture on 'Ritucharya' by Vaidya Suvinay Damle
Mayem News: केळबाई देवस्थानावरील निर्बंध मागे घ्या- भाविकांची मागणी

सुगंधी अत्तर, सुगंधी जलतुषार सिंचन, आल्हाददायक आणि आरोग्यदायी सरबत, वाळ्याचे थंड दूध, चविष्ट अशी आंब्याची डाळ प्रत्येकाला देण्यात आली. त्यानंतर नौकेत बसून मयेच्या तलावातून विहार करण्‍यात आला.

याबरोबरच उन्हाळा आणि पावसाळ्यात हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आहारात काय बदल करायला हवेत या विषयावरील वैद्य सुविनय दामले यांचे उद्बोधक व्याख्यान झाले. वैद्य सृष्टी गवस यांनी उन्हाळ्यातील आहार- विहार विषयावर मांडणीसह मार्गदर्शन केले.

Mayem Lecture on 'Ritucharya' by Vaidya Suvinay Damle
Mayem panchayat : मये पंचायत प्रकल्प पूर्णत्वाकडे; दोन वेळा पायाभरणी

आरोग्य हितकर सत्र

प्रख्यात वैद्य आणि आयुर्वेद गुरू वैद्य सुविनय दामले यांचे ‘ऋतुचर्या’ या विषयावर व्याख्यान आणि त्‍यांच्‍या सान्निध्यात नौकानयन असे आरोग्य हितकर सत्र लक्षवेधी ठरले. देशात आपण सहा ऋतू अनुभवतो. त्‍यामध्‍ये आहार-विहार कसा असावा, याविषयी सखोल विवेचन प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमध्ये करण्‍यात आले आहे. त्‍यातील ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी वैद्य कार्य करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com