आणि पणजीचे महापौर जुन्या पाटो पुलाकडे धावले...

 Mayor of Panaji smashed to municipal employees
Mayor of Panaji smashed to municipal employees

पणजी : शहराचे माजी महापौर तथा नगरसेवक विठ्ठल चोपडेकर यांच्या प्रभागातील रस्त्यांवर रात्रीच्यावेळी अस्ताव्यस्त उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. 


 नगरसेवकांऐवजी महापौर उदय मडकईकर यांना येथील नागरिक फोन करून तक्रारी करीत आहेत, त्यामुळे या तक्रारी आमदारांकडे जाण्याऐवजी महापौरांना तेथील वाहनांवर कारवाई करण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. 


महापालिकेने पार्किंग नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी नेमलेल्या कामगारांनी काही रक्कम घेऊन त्यावर कारवाई करण्याचे सोडून दिल्याचे उदाहरण काल (गुरुवारी) रात्री महापौरांनी पाहिले. त्यानंतर घरी जाऊन काहीवेळ विश्रांती घेतोय तोच प्रभाग क्रमांक २८ मधील म्हणजेच माजी महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्या प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी महापौरांकडे येण्यास सुरवात झाली.


 घरातून बाहेर पडण्यासही येत नसल्याने वाहनांवर महापालिकेचे कर्मचारी कारवाई करीत नाहीत, असे तक्रार आल्याने मडकईकर पुन्हा जुन्या पाटो पुलाकडे धावले. 


 जुन्या पाटो पुलापासून ते जुन्या सचिवालयापर्यंत पार्किंगचा नियम मोडून उभ्या केलेल्या वाहनांना टाळे ठोकण्यास स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून सांगितले. त्यामुळे काल रात्री ४० चारचाकी आणि ३८ दुचाक्यांवर कारवाई 
झाली. 


दरम्यान, सायंकाळी महापौर पर्यवेक्षक व कामगारांना कारवाईच्या सूचना देऊन घराकडे जात असताना काही कामगार वाहन उभे करण्यासाठी पर्यटकांकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकांच्या तक्रारी आल्यामुळे पुन्हा त्याठिकाणी गेलेल्या महापौरांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 


काल रात्री वाहतुकीचा नियम मोडणाऱ्या निपाणी नगराध्यक्षाच्या वाहनालाही लॉक ठोकण्यात आले. परंतु या वाहनातून खरोखरच नगराध्यक्ष आले होते की आणखी कोण, हे मात्र समजू शकले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com