Goa Municipal Mayor: नगराध्यक्षपदासाठी येत्या 27 मे रोजी निवडणूक

The mayoral election for Mapusa Madgaon and Margao will be held on May 27
The mayoral election for Mapusa Madgaon and Margao will be held on May 27

पणजी: म्हापसा, मडगाव व मुरगाव(Mapusa, Madgaon, Margao) या तीन पालिकांसाठीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठीची(Mayor and Deputy Mayor) निवडणूक(Election) येत्या 27 मे रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आली आहे. ही निवडणूक गेल्या 10 मे रोजी ठेवण्यात आली होती. या पालिकांमधील काही नगरसेवक कोरोना संसर्ग झाल्याने ती बेमुदत तहकूब करण्यात आली होती. (The mayoral election for Mapusa Madgaon and Margao will be held on May 27)

मडगाव पालिकेची निवडणूक विरोधी पक्षनेते व गोवा फॉरवर्ड पक्षाने संयुक्तपणे पॅनल उभे करून बहुमताने जिंकली आहे त्यामुळे या पालिकेवर या पॅनेलमधून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवड होणार आहे. मुरगाव पालिकेत भाजप समर्थक गटाचे बहुमत आहे. म्हापसा पालिकेत भाजप व सुधीर कांदोळर गटाचे समान नगरसेवक ( प्रत्येकी 9) निवडून आले होते तर दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते.

गोव्यातील चिकन विक्रेते देणार घरपोच सेवा                                                                     

कांदोळकर यांच्या गटातील शुभांगी वायंगणकर यांना भाजपात प्रवेश दिल्याने त्यांची संख्या 10 वर गेली झाली आहे व कांदोळकर यांच्याच गटाच्या एका नगरसेवकाने भाजप समर्थक गटाला पाठिंबा व्यक्त केला आहे. दोन अपक्ष नगरसेवकांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कांदोळकर गटातील नगरसेवकांची संख्या 9 वरून 7 वर आली आहे. भाजपने बहुमत मिळवण्यास केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com