म्हापशातील मांस विक्री स्टॉलही अंशत: सुरू

meat
meat

म्हापसा

म्हापसा नगरपालिकेने बाजारपेठेतील मांस विक्री स्टॉल्स टप्प्याटप्प्याने सुरू करू देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रतिदिन केवळ तीन स्टॉल्स खुले ठेवण्याची मुभा पालिकेने दिली आहे. असे असले तरी सध्या या विक्रत्यांना ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
यासंदर्भात बोलताना नगराध्यक्ष रायन ब्रागांझा म्हणाले, मांसविक्रीचे सर्व स्टॉल्स एकाच बरोबरीने सुरू करण्याची मुभा पालिकेने दिली असती तर त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रतिदिन केवळ तीन स्टॉल्स खुले ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मांसविक्री स्टॉल्समधील कचरा व टाकावू अवयवांची विल्हेवाट योग्य तऱ्हेने व्हावी यासाठी तत्सम सर्व पदार्थ गणेशपुरी येथील कचरा प्रकल्पापर्यंत नेण्याची जबाबदारी सध्या संबंधित विक्रेत्यांवरच सोपवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यवसाय करण्यावरून विक्रेत्यांमध्ये गोंधळ माजू नये यासाठी त्या सर्व विक्रेत्यांना विश्‍वासात घेण्यात आले असून, आळीपाळीने स्टॉल्स खुले करण्याबाबत विक्रेत्यांचेही एकमत झाले आहे. सध्या ही दुकाने सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत खुली असतील. स्टॉल्सच्या ठिकाणी फारशी गर्दी होत नाही असे आढळून आल्यास टप्प्याटप्प्याने आणखीन काही स्टॉल्स खुले करण्याचा निर्णय पालिका घेऊ शकते, असेही नगराध्यक्ष ब्रागांझा म्हणाले.
हे स्टॉल्स सुरू करण्यात आले असले तरी सध्या त्या विक्रेत्यांना पुरेसे गिऱ्हाईक येत नाहीत. टाळेबंदीच्या काळात बार्देश तालुक्‍यात आता विविध गावांमध्ये मांसविक्री केली जात असल्याने, लोक शहरात यायचे टाळतात व त्यामुळे ग्राहकवर्गाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही, असे यासंदर्भात बोलताना एका मांसविक्रेत्याने सांगितले. टाळेबंदीमुळे बहुतांश लोकांकडे पुरेशा प्रमाणात पैसा घोळत नाही व त्यामुळेही व्यवसायावर परिणाम झाल्याचे ते म्हणाले. मांसविक्रीची दुकाने पुन्हा सुरू करण्याची मुभा देऊन म्हापसा पालिकेने एक चांगला निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

Goa Goa Goa

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com