Minakshi Lekhi
Minakshi LekhiGomantak Digital Team

Goa News : भारताने अनेक आक्रमणे यशस्‍वी झेलली

मीनाक्षी लेखी : जॉर्जियाची राणी केटावन यांच्या स्मरणार्थ जुने गोवेत गॅलरी

Goa News : भारतावर अनेक वेळा आक्रमणे झाली. धार्मिक स्थळांची नासधूस करण्‍यात आली. तरीही आम्‍ही डगमगलो नाही. भारतीयांचा हा एक गुण आहे. त्यामुळे आज देखील आम्ही सर्व धर्म आणि इतिहासाचा आदर करतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले.

जुने गोवा येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा वेल्हा वस्तुसंग्रहालात जॉर्जियाची राणी केटावन यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या गॅलरीच्या उद्‌घाटन सोहळ्यात लेखी बोलत होत्या. यावेळी जॉर्जियाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री आलेक्‍झांडर क्विटीयाशव्हिली, जॉर्जियाचे भारतातील राजदूत आर्चिल झुझासव्हिली, जॉर्जियन ऑर्थोडोक्स चर्चचे फा. आर्चिल खाचिडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 Minakshi Lekhi
IPL 2023: गुजरातने मिळवलं प्लेऑफचं तिकिट! सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव

राणी केटावन यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचे अवशेष गोव्यात असून ते जॉर्जियात नेण्यात अनेकांचे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कलामंत्री मीनाक्षी लेखी या दोन्‍ही देशांतील संबंध आणखी दृढ करण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत. त्‍यामुळे त्‍यांचे कौतुक वाटते. राजदूत आर्चिल झुझासव्हिली हे त्‍यांना याकामी मदत करत आहेत, असे जॉर्जियाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री आलेक्‍झांडर क्विटीयाशव्हिली यांनी सांगितले.

 Minakshi Lekhi
Goa Petrol-Diesel Price: काय आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव? जाणून घ्या एका क्लिकवर

राणी केटावन या हुतात्मा झाल्‍या. त्यांची कहाणी आणि भारताच्या इतिहासात साम्य आहे. त्यांचे अवशेष जुने गोवे येथे होते. त्यामुळे भारत आणि जॉर्जिया यांच्यात थेट नाते निर्माण झाले. आज या गॅलरीचे उद्‌घाटन करताना खूप आनंद होत आहे.

मीनाक्षी लेखी, केंद्रीय मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com